घरCORONA UPDATECorona : नाशकात दिवसभरात ५७ बळी

Corona : नाशकात दिवसभरात ५७ बळी

Subscribe

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि.२०) दिवसभरात उच्चांकी ५७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये नाशिक शहर ९, नाशिक ग्रामीण ४३, मालेगाव ३ आणि जिल्ह्याबाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात ५ हजार ५ नवे रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. त्यात नाशिक शहर २ हजार ७७७, नाशिक ग्रामीण २ हजार १६७, मालेगाव २१ आणि ४० रुग्ण आहेत.

सोमवारी दिवसभरात ३ हजार ८६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात सध्या ४२ हजार २४२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे ३ हजार ३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ४ हजार ५१७ संशयित रुग्ण जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल झाले. त्यात जिल्हा रुग्णालय ९, नाशिक महापालिका रुग्णालय ४ हजार १२५, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्याल २३, मालेगाव महापालिका रुग्णालय ५१, नाशिक ग्रामीण रुग्णालय ३०९ रुग्ण दाखल झाले. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व पोलिसांकडून कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयित रुग्णांचा शोध घेतला जात आहे. दिवसभरात बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ६ हजार ५५ रुग्णांनी कोरोना टेस्ट केली. त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. यामध्ये नाशिक शहर १ हजार ४६२, नाशिक ग्रामीण ३ हजार ७०८, मालेगाव ८८५ संशयित रुग्णांचा समावेश आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी त्रिसूत्रींचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

- Advertisement -

नाशिक शहरात कोरोनासदृश्य लक्षणे आढळून येणारे रुग्ण कोरोना टेस्ट करुन तात्काळ रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे शहरातील सर्वाधिक १ लाख ४१ हजार ५४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर नाशिक ग्रामीणमधील अनेक रुग्णालयात जाण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात मृत रुग्णांची संख्या वाढू लागली आहे, अशी शंका वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -