घरमहाराष्ट्रनाशिकअमावस्येच्या पार्श्वभूमीवर निंबाखाली कणकेचे दिवे !

अमावस्येच्या पार्श्वभूमीवर निंबाखाली कणकेचे दिवे !

Subscribe

अंधश्रद्धा पसरवणार्‍या संदेशांनी नवीन नाशिकला घेरले; अनेक महिला अफवांना बळी

नवीन नाशिक- करोनाने सर्वत्र भीतीचे सावट पसरलेले असताना नवीन नाशिक भागात वार्‍याच्या वेगाने अफवा पसरत आहेत. तृतीयपंथीयाला मारल्यामुळे करोनाची साथ पसरल्याच्या अफवेने आता जोर धरला आहे. या अफवेचा धागा पकडत करोना होऊ नये म्हणून अंधश्रध्दाळू लोक आमवस्येच्या पार्श्वभूमीवर चक्क पिठाच्या कनकेचे दिवे कडूनिंबाच्या झाडाखाली ठेवत आहेत. या सर्व प्रकाराला अंधश्रध्दा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला आहे.
करोनाच्या साथीने अनेकांची झोप उडवली आहे. ‘आपल्यालाही करोना होतो की काय’ अशा भीतीने अनेकांना पछाडले आहे. वारंवार करोनाचेच वृत्त कानावर पडत असल्यामुळे नागरिकांच्या चिंतेत कमालीची वाढ झाली आहे. त्याची परिणीती म्हणजे अनेकांना आता मानोविकारांनी ग्रासले आहे. दुसरीकडे अनेकांनी देवाचा धावाही सुरु केला आहे. काही ठिकाणी ‘महामृत्यूंजय’ मंत्र म्हटले जात आहेत. तर काही ठिकाणी अन्य प्रकारच्या अफवांना पेव फुटले आहे. नवीन नाशिक परिसरात असाच एक संदेश जोरात फिरत आहे. त्यात म्हटले आहे की, एका तृतीयपंथीयाचा छळ करून त्यास कुणीतरी मारल्याने त्याने शाप दिला असून त्यामुळेच कोरोनाची साथ पसरली आहे. आपल्याला व आपल्या कुटूंबाला लागण होऊ नये म्हणून आजच्या अमावस्येच्या पार्श्वभूमीवर कडूनींबाच्या झाडा खाली कनकेचे दिवे लावल्यास बाधा होणार नाही व कोरोना रोग पळून जाईल असे संदेशात म्हटले आहे. या अफवेवर विश्वास ठेऊन परिसरातील अनेक अंधश्रद्धाळू महिला व मुलांची कडूनिंबाच्या झाडांखाली दिवे लावण्यासाठी गर्दी करत आहेत. अनेकांनी तर दिवाळी प्रमाणे आपल्या घरा बाहेरही कणकेचे दिवे लावल्याचे चित्र आहे. एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत जग विज्ञानवादी होत असताना नाशिकमध्ये मात्र आजही अशा भंपक अफवांना भीक घातले जात असल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चिंता व्यक्त केली आहे.

करोनाच्या संकटाशी काळजी घेऊन प्रतिकार करता येणार आहे. घराबाहेर न पडणे हा त्यासाठी सर्वात्तोम उपाय आहे. मात्र काही मंडळी अंधश्रद्धा पसरवणार्‍या अफवा पसरवण्यात धन्यता मानत आहेत. विशेष म्हणजे अशा अफवांना बळी पडणार्‍याही काही महिला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच आम्ही वेगवेगळी दोन प्रकरणे जिल्हाधिकार्‍यांना निदर्शनास आणून दिली आहे. अशा अफवा पसरवणार्‍यांचाही आम्ही निषेध करतो. अशा अफवांमधून नको त्या गोष्टींना प्रोत्साहन मिळून लोक शास्त्रीयदृष्ठ्या प्रतिबंध करण्याच्या उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करतील याचीच चिंता आहे.
-कृष्णा चांदगूडे, पदाधिकारी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती

 

 

 

अमावस्येच्या पार्श्वभूमीवर निंबाखाली कणकेचे दिवे !
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -