Corona : नाशकात तासाला होतोय एकाचा मृत्यू

४८ तासांत ४३ रुग्णांचा मृत्यू ; सोमवारी २८४७ रुग्ण

corona patient dead body
प्रातिनिधिक छायाचित्र

नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना उपचार घेणार्‍या रुग्णांचा मृत्यूच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये जिल्ह्यात तब्बल ४३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तासाला एका व्यक्तीला प्राण गमावावे लागत असल्याचे गेल्या काही दिवसांच्या मृतांच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सोमवारी (दि.२९) दिवसभरात २ हजार ८४७ रुग्ण बाधित आढळून आले.

जिल्ह्यात १ लाख ७४ हजार ६८२ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. त्यापैकी १ लाख ४७ हजार १४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. विशेस म्हणजे, जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्येत वेगाने वाढ होवू लागली असून, सोमवारअखेर जिल्ह्यात २५ हजार १९० रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये नाशिक शहर 1५ हजार २३३, नाशिक ग्रामीण ८ हजार १४८, मालेगाव 1 हजार ५९५ आणि जिल्हा बाहेरील २१४ रुग्ण आहेत. सोमवारी दिवसभरात २ हजार ८४७ रुग्ण बाधित आढळून आले. त्यात नाशिक शहर 1 हजार 658, नाशिक ग्रामीण 981, मालेगाव 175 आणि जिल्हा बाहेरील ३३ रुग्ण आहेत. दिवसभरात २५ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये नाशिक शहर ५, मालेगाव ३ आणि नाशिक ग्रामीणमधील १७ रुग्णांचा समावेश आहे.