घरCORONA UPDATEदिलासाजनक! नाशिकामध्ये कोरोनास्थिती सुधारते, ऑक्सिजन पुरवठा वाढतोय

दिलासाजनक! नाशिकामध्ये कोरोनास्थिती सुधारते, ऑक्सिजन पुरवठा वाढतोय

Subscribe

गेल्याकाही दिवसांपासून राज्यात कोरोना विषाणूने हैदोस घातला आहे. यात नाशिक शहरासह जिल्हातही कोरोना रुग्णसंख्या वाढत होती. यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये मेडिकल ऑक्सिजनसाठी आणीबाणीसदृश परिस्थिती उद्भवली होती, मात्र सध्याचा घडीला नाशकमधील कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असून रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठाही मागणीप्रमाणे उपलब्ध होत असल्याचा दावा नाशिकमधीस वैद्यकीय व्यावसायिकांनी केला आहे.

नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येने हजारोंचा टप्पा ओलांडल्याने जिल्ह्याली प्रतिदिन १४० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासत होती. मात्र ६७ ते ६८ मेट्रिक टनच ऑक्सिजन जिल्ह्यात उपलब्ध होत होते. त्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन अभावी रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा घटना घडल्या. परंतु सध्य परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार आणि नाशिक जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून १०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा मंजूर करण्यात आला आहे. यासाठी ब्राम्हणवाडे येथील परिसरात ऑक्सिजन प्लांट युद्ध पातळीवर सुरु करण्यात आहे. यामुळे नाशकात सध्या १०० मेट्रिक टनच्या आसपास ऑक्सिजन पुरवठा होत आहे असून खासगी रुग्णालयांमध्येही पाच- सहा तासांमध्ये ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे.

- Advertisement -

दरम्यान रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडाही तुलनेने कमी भासत आहे. तर अत्यावश्यक असलेल्या कोरोना रुग्णाला हे इंजेक्शन वेळेव र उपलब्ध होत आहे. खासगी हॉस्पीटलच्या मागणीच्या तुलनेत ६० ते ७० टक्के रेमडेसिवीर सध्या उपलब्ध आहे. आमच्याकडे केएल लिक्विड स्टोरेज टँक आहे. त्याचाआधारे दिवसाआड लिक्विडचे टँकर उपलब्ध होत आहेत. तर खबरदारी म्हणून स्थानिक उत्पादकांकडूनही काही ऑक्सिजन सिलेंडर भरून ठेवले जात असल्याचे मत अपोलो रुग्णालयाचा डॉक्टरांनी व्यक्त केले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -