घरताज्या घडामोडीनाशकात दोन वर्षीय बाळाला करोनाची लागण

नाशकात दोन वर्षीय बाळाला करोनाची लागण

Subscribe

नाशिक जिल्हा प्रशासनास शनिवारी (दि.१६) 256 अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 9 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 8 पॉझिटिव्ह रुग्ण मालेगावातील असून नाशिक शहरात एका दोन वर्षीय बाळाला करोनाची लागण झाली आहे. आता नाशिक जिल्ह्यात एकूण ७८४ करोनाबाधित रुग्ण असून एकट्या मालेगावात ६१० रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. दरम्यान, पुर्वी शंभरमध्ये दोन अंकीपेक्षा अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत होते. ते प्रमाण आता कमी होत चालले आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनास शनिवारी दिवसभरात दोन टप्प्यात अहवाल प्राप्त झाले. पहिल्या टप्प्यात मालेगावातील ९३ संशयित रुग्णांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यामध्ये तीन रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दोन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. तर, दुसर्‍या टप्प्यात जिल्ह्यातील ८३ रिपोर्ट प्राप्त झाले असून ते सर्व निगेटिव्ह आहेत. शनिवारी रात्री प्रशासनास मालेगावातील ८० अहवाल प्राप्त झाले. यामध्ये दोन पॉझिटिव्ह, ६७ निगेटिव्ह व ११ जणांचे अहवाल परत पाठविण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. त्यास नागरिकांचासुद्धा प्रतिसाद मिळत आहे. करोनासदृश्य लक्षणे दिसताच नागरिक स्वत:हून आरोग्य यंत्रणेस संपर्क साधत आहेत. त्यामुळे संशयित करोना रुग्णांवर वेळीच उपचार करता येत असल्याने करोनापासून नागरिकांचा बचाव करण्यात आरोग्य यंत्रणेला यश येअ आहे.

- Advertisement -

नाशिक शहरात ४६ करोनाबाधित रुग्ण
नाशिक शहरात दोन वर्षीय बाळाला करोनाची लागण झाली आहे. सिडकोतील करोनाबाधित टॅक्सीचालकाच्या संपर्कात आल्याने बाळाला करोनाचा संसर्ग झाला आहे. बाळावर आरोग्य विभागाकडून उपचार सुरु आहेत. नाशिक शहरात आता ४६ करोनाबाधित रुग्ण आहेत. आता नाशिक जिल्ह्यात एकूण ७८४ रुग्ण आहेत.

कळवणमध्ये संशयित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह

- Advertisement -

कळवणमधील शिवारीनगर परिसरात मंगळवारी ११ वर्षीय मुलगा करोनाबाधित आढळून आला. तो कळवणमधील करोनाचा पहिला रुग्ण आहे. आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून रुग्णाच्या संपर्कातील नातलग व नागरिक अशा एकूण नऊजणांचे घशाचे नमुने तपासणीसाठी नाशिकमध्ये पाठवण्यात आले होते. ते अहवाल शनिवारी प्राप्त झाले असता ते सर्व निगेटिव्ह आले.

नाशिक करोना अहवाल

पॉझिटिव्ह रुग्ण —७८४
मालेगाव ——६१०
नाशिक शहर —-४६
नाशिक ग्रामीण —९८
बरे झालेले रुग्ण —५३४
मृत रुग्ण ——३३

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -