Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE कोरोनाच्या भीतीने पत्नीला हार्टअटॅक, पतीची आत्महत्या

कोरोनाच्या भीतीने पत्नीला हार्टअटॅक, पतीची आत्महत्या

Related Story

- Advertisement -

कोरोना झाल्याच्या भीतीने जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेचा हार्टअटॅकने मृत्यू झाला. ही बाब पतीला समजताच त्याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पत्नी संगीता पवार व पती रवींद्र पवार असे मृत्यू झालेल्यांची नाव आहेत.
सातपूर येथील महिला उपचारार्थ दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. तुमच्यात कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. आपला कोरोनाने मृत्यू होईल या भीतीने तिला हार्टअटॅक आला. त्यात तिचा मृत्यू झाला. ही बाब पतीला समजली असता त्यास पत्नीचा मृत्यू झाल्याचा धक्का सहन झाला नाही. पतीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

- Advertisement -