घरमहाराष्ट्रनाशिककोरोना पॉझिटिव्ह दर अद्यापही ५ टक्क्यांपेक्षा अधिक

कोरोना पॉझिटिव्ह दर अद्यापही ५ टक्क्यांपेक्षा अधिक

Subscribe

बाजारपेठां तसेच पर्यटन स्थळांवर गर्दी मात्र कायम

बाजारपेठां तसेच पर्यटन स्थळांवर होणारी गर्दी, रूग्णसंख्येचा कमी अधिक होत जाणारा आलेख तसेच कोरोना पॉझिटिव्ह दर अद्यापही ५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने याबाबी विचारात घेता नाशिकमधील निर्बंध शिथिलतेबाबत नाशिककरांना अजून काही दिवस प्रतिक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे जिल्हयात तिसर्‍या टप्प्यातीलच निर्बंध काही दिवस तसेच राहतील असे सुत्रांकडून समजते. यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत होणार्‍या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येऊ लागल्याने राज्यात पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. ५ ते १० टक्क्यांपर्यंत पॉझिटिव्हीटी दर असलेल्या जिल्हयांमध्ये तिसर्‍या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. नाशिकमध्ये शहरात रूग्ण पॉझिटिव्हीटी दर कमी असला तरी ग्रामीण भागात तो अधिक असल्याने सध्या तरी संपूर्ण जिल्हयात तिसर्‍या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानूसार जिल्हयातील दैनंदिन व्यवहार हे दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच शनिवार आणि रविवार दोन दिवस विकेंड लॉकडाऊनही केला जात आहे. दर आठवडयाला कोरोना रूग्णसंख्या विचारात घेवून निर्बंधांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. गत आठवडयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दुसर्‍या टप्प्यातील निर्बंध कायम ठेवण्यात येऊन निर्बंधातून काही प्रमाणात सुट देण्याबाबत शनिवारी होणार्‍या बैठकीत निर्णय घेण्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता नाशिकमधील निर्बंध शिथिल होऊन दुकानांना वेळ वाढवून देणार का तसेच मॉल्स, मल्टिप्लेक्स, नाटयगृहे सुरू होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

- Advertisement -

सध्या तरी नाशिकमध्ये सर्व व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. परंतु बाजारपेठांमध्ये गर्दी कायम आहे. तसेच पर्यटनस्थळांवरही नागरिक गर्दी करत असून सोशल डिस्टिंन्सिंगचे नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. रूग्णसंख्या जरी आटोक्यात आली असली तरी जिल्हा पुर्णपणे कोरोनामुक्त झालेला नाही. शहरातही अधून मधून रूग्णसंख्या कमी अधिक होत आहे. नुकतीच मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत अशाच पध्दतीने गर्दी राहीली तर तिसरी लाट दोन चार आठवडयातच येईल अशीही भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये तरी अजून काही दिवस निर्बंध शिथिल करण्याबाबत प्रशासन राजी नसल्याचे सुत्रांकडून समजते. एकदा अनलॉक केल्यानंतर पुन्हा निर्बंध लादणे अडचणीचे ठरेल त्यामुळे काही दिवस तरी प्रशासन वेट अँन्ड वॉचची भुमिकेत दिसून येते. याबाबत पालकमंत्री आढावा घेणार आहेत.

अटी-शर्थींवर मॉल्स सुरू करण्याचा विचार

तिसर्‍या टप्प्यात मॉल्स बंद ठेवण्यात आले असले तरी शहरात सर्वच व्यवहार सुरू झालेले आहेत. तसेच शहराचा पॉझिटिव्हीटी दरही कमी असल्याने मॉल्स चालकांवरच अन्याय का अशी भुमिका व्यावसायिकांनी मांडली. त्यामुळे ४ वाजेपर्यंतचे निर्बंध कायम ठेऊन ५० टक्के क्षमतेच्या अटी शर्थींवर मॉल सुरू करण्यास परवानगी देण्याबाबत विचार सुरू असल्याचे समजते याबाबत या बैठकीत निर्णय होणे अपेक्षित आहे.

कोरोना रूग्ण सद्यस्थिती

  • जिल्हयातील रूग्णसंख्या ३५८५
  • ग्रामीण १९०४
  • नाशिक महापालिका १५४१
  • मालेगाव १३०
  • जिल्हा बाहय १०
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -