घरताज्या घडामोडीकोरोनाला हरविणार्‍या पोलीस अधिकार्‍याचा हृदयविकाराने मृत्यू

कोरोनाला हरविणार्‍या पोलीस अधिकार्‍याचा हृदयविकाराने मृत्यू

Subscribe

करोनामुक्त होऊन घरी परतलेल्या मालेगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकारी युनूस शेख (५५) यांचा सोमवारी (दि.१) हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. कोरोनाला हरविणार्‍या या अधिकार्‍याला काळाने हिरावून नेल्याने त्यांच्या सहकार्‍यांना मोठा धक्का बसला. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील ३ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेला मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. मालेगावात ७८० बाधित रुग्ण आहेत. मालेगावत कर्तव्य बजावताना १५० हून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलाने खबरदारी म्हणून दोन महिन्यांहून अधिक दिवस मालेगावी कर्तव्य बजावलेल्या ७१ पोलिसांना नाशिक शहरातील डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात क्वारंटाइन केले आहे. १३ मे रोजी युनूस शेख यांच्यात कोरोनासदृश्य लक्षणे दिसून आल्याने उपचारार्थ त्यांना मालेगावी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. २७ मे रोजी रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ते घरी परतले होते.१ जून रोजी त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास सुरु झाला. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यावर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना नाशिकला हलविण्यात आले होते. मात्र, त्यांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -