घरमहाराष्ट्रनाशिकस्मार्ट हेल्मेट करणार कोरोना स्क्रीनिंग

स्मार्ट हेल्मेट करणार कोरोना स्क्रीनिंग

Subscribe

नाशिक बाजार समितीत शेतकरी व बाजार घटक यांची मास स्क्रीनिंग

नाशिक बाजार समितीमध्ये रॅपिड अँटिजेन टेस्टनंतर आता शेतकरी, व्यापार्‍यांसह बाजार घटकांचे स्मार्ट हेल्मेटद्वारे स्कॅनिंगही सुरू करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या वतीने आणि कृषी उत्पन्न बाजार समिती व नाशिक महापालिका यांच्या पुढाकाराने दिंडोरी रोड मार्केटात स्मार्ट हेल्मेट मास स्क्रीनिंग या तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट कामकाजाचा शुभारंभ झाला. याप्रसंगी मनपा आयुक्त कैलास जाधव, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे, बीजेएस मिशन झिरो प्रकल्प संचालक नंदकिशोर साखला, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, मनपा विभागीय अधिकारी विवेक धांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर, भूषण देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्यात लॉकडाऊन शिथील करण्यात येऊन शेतकरी बांधवांचे अर्थचक्र सुरू रहावे, यासाठी बाजार समित्या पूर्ववत केल्या गेल्या. मात्र, मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी शेतकरी व बाजार घटकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून नवनवीन योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न बाजार समिती संचालक मंडळाकडून सातत्याने केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मास स्क्रीनिंगद्वारे शारीरिक तापमान जास्त असलेल्या संशयितांना शोधण्यासाठी स्मार्ट हेल्मेट तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मास स्क्रिनिंगकरीता उपकरणे व कर्मचारी उपलब्ध करुन दिल्याबद्दल भारतीय जैन संघटनेचे नंदुूशेठ साखला यांचे पिंगळे यांनी आभार मानले. याप्रसंगी दीपक चोपडा, अभय ब्रम्हेचा, यतीश डुंगरवाल, गोटू चोरडिया, सतीश बोरा यांसह दिलीप थेटे, तुकाराम पेखळे, विश्वास नागरे, रवींद्र भोये, संदीप पाटील, प्रकाश घोलप, निवृत्ती बागूल, रवींद्र तुपे, डॉ. शालोम सय्यद उपस्थित होते.

आरोग्यचक्र व अर्थचक्र दोन्ही सांभाळायचे असल्याने बाजार समितीकडून सर्वच शेतकरी, बाजार घटक यांनी मास स्क्रीनिंगसाठी सहकार्य करावे. यामुळे बाजार समिती आवारात कोरानाचा संसर्ग थांबण्यास मदत होईल.
– देविदास पिंगळे, सभापती, नाशिक कृउबा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -