Sunday, July 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE Corona : नाशिक जिल्ह्यात रुग्णसंख्येने ओलांडला चार लाखांचा टप्पा

Corona : नाशिक जिल्ह्यात रुग्णसंख्येने ओलांडला चार लाखांचा टप्पा

Related Story

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव ओसरला असला तरी रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यात रविवारी (दि.१८)१४२ नवे रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४ लाख १ हजार २२६ पर्यंत पोहोचली असून, ८ हजार ४७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रविवारी दिवसभरात १२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर नाशिक शहर ५५, नाशिक ग्रामीण ७३, मालेगाव ३ आणि जिल्ह्याबाहेरील ११ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. दिवसभरात नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीणमधील प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात २१ लाख ४८ हजार २९९ संशयित रुग्णांनी कोरोना टेस्ट केली. त्यामध्ये तब्बल ४ लाख एक हजार २२६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले तर १७ लाख ४६ हजार ५१८ रुग्ण निगेटिव्ह आढळून आले. जिल्ह्यात एक हजार ५५६ सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये नाशिक शहर ६४८, नाशिक ग्रामीण ८३४, मालेगाव ६० आणि जिल्ह्याबाहेरील १४ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे.

- Advertisement -