घरताज्या घडामोडीकरोना सर्वेक्षणात हलगर्जीपणा नको!

करोना सर्वेक्षणात हलगर्जीपणा नको!

Subscribe

जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांची अधिकार्‍यांना तंबी

नाशिक : आरोग्य विभागातील कर्मचारी उन्हातान्हात करोना सर्वेक्षणाचे काम करत आहे. या काळात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिला. शासनाने सोमवार (दि.20) पासून 10 टक्के कर्मचार्‍यांच्या उपस्थितीसह शासकीय कार्यालय सुरु करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हा परिषदेचे कामकाज सुरू झाले. अध्यक्ष क्षीरसागर यांनी सोमवारी प्रशासनाकडून करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उपाययोजना व कामकाजाचा आढावा घेतला. अध्यक्ष दालनात झालेल्या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, सभापती संजय बनकर यांसह विभागप्रमुख उपस्थित होते.
&
दोन हजार कर्मचार्‍यांना मास्क
गिव्ह सामाजिक संघटनेच्या वतीने कोरोनासाठी काम करणार्‍या जिल्हा परिषदेच्या ग्रामस्तरावरील कर्मचार्‍यांसाठी साहित्य उपलबध करुन देण्यात येत आहे. जि. प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, सीईओ लीना बनसोड, उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर आदिंना औपचारिक स्वरुपात साहित्याचे वितरण केले. यात दोन हजार कर्मचार्‍यांसाठी चेहर्‍याला सरंक्षित करणारे प्लास्टिकचे मास्क (शिल्ड), बेडशीट, उशीसह 100 कॉट आदि साहित्य दिले. तसेच आयसीआयसीआय बँकेचे प्रतिनिधी विनय चंद्रात्रे यांच्या हस्ते सॅनेटायजर्सचे वाटप करण्यात आले.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -