घरCORONA UPDATECORONAVIRUS : पोलिसासह १९ जणांचा बळी

CORONAVIRUS : पोलिसासह १९ जणांचा बळी

Subscribe

दिवसभरात 1597 पॉझिटिव्ह, १७१८ कोरोनामुक्त

पोलीस आयुक्तालयातील बिनतारी संदेश वहन यंत्रणा विभागात ते कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र भदाणे (५४) यांचा गुरुवारी (दि.१७) कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. अंबड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विजय शिंपी व सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील शिंदे यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना गुरुवारी ही घडल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. दिवसभरात १९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

आजवर नाशिक जिल्ह्यात आठ कोरोनाबाधित पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर पोलीस दलातील ५ आणि नाशिक ग्रामीण पोलीस दलातील ३ जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, अंबड पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. नाशिक शहर पोलीस दलात २०८ हून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात 145 पोलीस कर्मचार्‍यांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या १8 पोलीस उपचार घेत आहेत.

- Advertisement -

गुरुवारी दिवसभरात १५९७ नवे रुग्ण

जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात १५९७ नवे रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून १७१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बाधित रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीण ५४६, नाशिक शहर १०२१, मालेगाव २२ आणि जिल्ह्याबाहेरील ८ रुग्णांचा समावेश आहे. मृत १९ रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीण ८, नाशिक शहर ७ आणि मालेगावमधील ४ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात १ हजार ८७५ संशयित रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये दाखल झाले.

Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -