घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रलाचखोर पोलीस उपनिरीक्षक गजाआड

लाचखोर पोलीस उपनिरीक्षक गजाआड

Subscribe

कारवाई टाळून मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून २७ हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) जायखेडा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकासह एकाला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मुरलीधर नवगिरे, रमेश कचरु गरुड (रा.काकडगाव, ता. बागलाण, जि. नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मुरलीधर नवगिर जायखेडा पोलीस ठाण्यात नेमणूक आहे. जायखेडा पोलीस ठाणेअंतर्गत पोलीस दूरक्षेत्र, नामपूर येथील तक्रार अर्जाबाबत तक्रारदारावर कारवाई न करण्यासाठी व मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक नवगिरे यांच्यामार्फत गरुड याने तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी करत शहानिशा केली. त्यानुसार पथकाने सापळा रचला. पोलीस उपनिरीक्षक नवगिरे यांनी गरुड यांच्यामार्फत २७ हजार रुपयांची लाच स्विकारताना अटक केली. याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -