सटाणा-देवळा रस्त्यावरील अपघातात दाम्पत्य जागीच ठार

पीकअप आणि मोटरसायकलचा अपघात, पीकअप उलटली

Accident

तरसाळी – सटाणा-देवळा रस्त्यावर असलेल्या तुर्की हुडीजवळ पीकअप आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि.६) घडली. या घटनेत अपघात टाळण्याच्या प्रयत्नात टेम्पो उलटल्याने तीन प्रवाशी जखमी झाले.

संतोष गांगुर्डे आणि आशा गांगुर्डे अशी मृतांची नावं असून, ते दोघंही मूळचे चांदवड तालुक्यातील रहिवाशी असून, सध्या देवळा तालुक्यातील वाजगावात राहत होते. सटाण्याकडून देवळ्याच्या दिशेने फरशी घेऊन जाणारी पीकअप आणि मोटरसायकल यांच्यात हा अपघात झाला. ही धडक एवढी भीषण होती की त्यात मोटरसायकलवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीकअप वाहन बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. जखमींना पुढील उपचारासाठी मालेगावी हलविण्यात आले आहे.