घरमहाराष्ट्रनाशिकसलग दुसऱ्या दिवशीही बिबट्याने घेतला गायीचा बळी, पिंजऱ्यात बछडा जेरबंद

सलग दुसऱ्या दिवशीही बिबट्याने घेतला गायीचा बळी, पिंजऱ्यात बछडा जेरबंद

Subscribe

नाशिकरोड येथील भगूर परिसरातील देवळाली रेस्ट कॅम्परोडवरील फरचंदी बागेत लावलेल्या पिंजर्‍यात शनिवारी, २३ फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास बिबट्याचा बछडा जेरबंद झाला. दरम्यान, लोहशिंगवे येथे सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याने गायीवर हल्ला करत बळी घेतला.

नाशिकरोड येथील भगूर परिसरातील देवळाली रेस्ट कॅम्परोडवरील फरचंदी बागेत लावलेल्या पिंजर्‍यात शनिवारी, २३ फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास बिबट्याचा बछडा जेरबंद झाला. दरम्यान, लोहशिंगवे येथे सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याने गायीवर हल्ला करत बळी घेतल्याने स्थानिक नागरिकांची मात्र पाचावर धारण बसली आहे. या ठिकाणी बनविभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली जाते आहे.

भगूर-नानेगाव रोडवरील फरचंदी बागेत चार दिवसांपूर्वी बागकाम करणाऱ्या वाल्मिक गिबल याच्यावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यांनी प्रसंगावधान राखत चपळाईने स्वतःला घरात बंद करुन घेतल्याने अनर्थ टळला होता. भेदरलेल्या वाल्मिकने चंद्रकांत कासार यांना माहिती दिल्यानंतर वन विभागाने येथे पिंजरा लावला. या पिंजऱ्यात शनिवारी सकाळी बछडा आढळून आल्याने वनविभागाचे राजेंद्र ठाकरे, उत्तम पाटील, अशोक खादोडे यांनी भेट दिली. यावेळी बछडा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या परिसरात बिबट्यांची संख्या जास्त असल्याने नागरिकांत दहशत असून, पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.

- Advertisement -

लोहशिंगवे गावातही धुमाकूळ

लोहशिंगवे गावातदेखील बिबट्याचा धुमाकूळ कायम असून, शनिवारी पहाटे पुन्हा एका गायीवर हल्ला करत फडशा पाडला. सुनील चौधरी यांच्या जनावरांच्या गोठ्यालगत बांधलेल्या गायीवर बिबट्याने पहाटेच्या सुमारास हल्ला करून ठार केले. गुरुवारी पहाटेदेखील लोहशिंगवे येथील भीमा जुंद्रे यांच्या अंगणात बांधलेल्या गायीचा बिबट्याने फडशा पाडला होता. वारंवार घडणार्‍या या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, पिंजरा लावण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -