Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक अबब! गायीची १ लाख ६१ हजारांना विक्री

अबब! गायीची १ लाख ६१ हजारांना विक्री

वाजतगाजत मिरवणूक काढून गायीची पाठवणी

Related Story

- Advertisement -

कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील अरुण रघुनाथ कदम यांची एच एफ होस्टेन दुसर्‍या वेताच्या पाच वर्षाच्या गायीची गुरुवारी (दि.३०) विक्री करण्यात आली. या गायीसाठी तब्बल एक लाख ६१ हजार रुपयांची किंमत कदम यांना मिळाली आहे. राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथील व्यापारी सिंकदर पठाण यांनी रोख रक्कम देत गाय खरेदी केली. विशेष म्हणजे, या गायीची वाजतगाजत मिरवणूक काढून पाठवणी करण्यात आली.

गायीची विक्रमी भावाला विक्री झाल्याची आनंदात कदम यांनी गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेकांनी गाण्यावर ठेका धरला होता. कदम म्हणाले की, मागील वेतामध्ये गायीने २७ लिटर दूध दिले होते. या वेळेला ३० लिटरच्या पुढे गाय दुध देईल. गोठ्यात सर्व एच. एफ. होस्टेन जातीच्या गायी असून खाद्य, चारा, पोषक घटकांचा समावेश वेळोवेळी खुराकामध्ये केलेला असतो. एक हेक्टर क्षेत्रावर केवळ चारा पिकांची लागवड केलेली असल्याने मेहनतीच्या जोरावर भरघोस ऊत्पन मिळत आहे. यावेळी कोळपेवाडी येथील मध्यस्थी राजेंद्र महाजन, व्यापारी सिकंदर पठाण व अरुण कदम यांचा गावकर्‍यांनी फेटा बांधून सत्कार केला. दरम्यान गाईचा सांभाळ केलेल्या कदम कुटुंबियांनी गळ्यात पडत साश्रूनयनांनी दिलेला निरोप बघता गावकरीही भावूक झाले होते.

- Advertisement -