घरमहाराष्ट्रनाशिकविश्वास नांगरे-पाटील यांच्या नावाचे मेसेज बनावट

विश्वास नांगरे-पाटील यांच्या नावाचे मेसेज बनावट

Subscribe

पोलीस आयुक्तालयाने केला खुलासा

विद्यार्थ्यांना शाळेची पुस्तके पाहिजेत, शाळेची फी भरू शकत नाहीत, त्यांनी खाली दिलेल्या कुठल्याही नंबरवर संपर्क करा, असे मेसेज पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा वापर करत राज्यभर व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर व्हायरल होत आहेत. प्रत्यक्षात पोलीस आयुक्त नांगरे-पाटील यांनी कोणालाही मेसेज केलेले नाहीत. नांगरे-पाटील याचे इन्स्टाग्राम, फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपवर अकाऊंट नाही, असे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -