घरमहाराष्ट्रनाशिकमुद्रांक जिल्हाधिकारी दवंगे यांच्या पत्नी, सासर्‍यांसह भूखंडप्रकरणी २९ जणांविरुद्ध गुन्हा

मुद्रांक जिल्हाधिकारी दवंगे यांच्या पत्नी, सासर्‍यांसह भूखंडप्रकरणी २९ जणांविरुद्ध गुन्हा

Subscribe

बनावट कागदपत्रांद्वारे केली ३० फ्लॉटसची परस्पर विक्री

नाशिक : तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी महसूल विभागाचे अधिकारी आरडीएक्स आणि भूमाफिया डिटोनेटर असल्याचे म्हटले होते. त्याचीच शब्दश: प्रचिती आता प्रचिती नाशिकमधील गंगापूररोडवरील निर्मला कॉन्व्हेंट शाळेजवळील भूखंडा विक्रीच्या एका प्रकरणातून आली आहे. या प्रकरणात बनावट कागदपत्रे आणि बोगस व्यक्ती वारसदार व साक्षीदार असल्याचे भासवत दस्तुरखुद्द मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांची पत्नी स्वाती दवंगे, सासरे सुरेश कारे यांच्यासह तब्बल 29 जणांनी परस्पर एका भूखंडावरील ३० पैकी प्लॉट्सची परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये जमीन खरेदी-विक्री करणार्‍या २९ जणांविरूध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

- Advertisement -

नेमक काय आहे प्रकरण ?

दीपाली शिंदे यांचे वडील अनिल ऊर्फ अशोक भालेराव, भगवान सोनवणे, कारभारी सोनवणे, तुळशीराम सोनवणे, दिलीप भालेराव, सुनील भालेराव, अविनाश भालेराव, चंद्रशेखर अयाचित यांचे खरेदी मालकीच्या प्लॉट मिळकती आहेत. हा भूखंड गंगापूर रोडवरील निर्मला कॉन्व्हेंटच्या परिसरात (सर्वे क्रमांक ७०२/1 अ ) येथील भूखंड आहे.या भूखंडाचे मालक अनिल भालेराव व साक्षीदार भगवान सोनवणे, कारभारी सोनवणे, तुळशीराम सोनवणे, सुनील भालेराव हे बाहेरगावी राहत असल्याचा संशयित आरोपींनी गैरफायदा घेतला. संशयित २९ जणांनी चंद्रशेखर अयाचित या मुख्य संशयित आरोपीसोबत संगनमत करत दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात बनावट कागदपत्रे व बोगस व्यक्ती उभे करून ३० प्लॉटपैकी २५ प्लॉटची परस्पर विक्री केली. चंद्रशेखर अयाचित याने पत्नीच्या नावे पाच प्लॉट मिळकतीचा बनावट विकसन करारनामा व मुखत्यारपत्र केले. त्यांनी साक्षीदारांना दस्तऐवज दिले नाही. संशयितांनी २१ मार्च २००५ ते २५ मे २००५ या कालावधीत बोगस व्यक्ती उभे करुन बनावट स्वाक्षरी व दस्तऐवज करुन प्लॉटची विक्री केली. दीपाली शिंदे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही पोलिसांनी कारवाई केली नाही. शिंदे यांनी न्यायालय अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खैरनार करत आहेत.

 

- Advertisement -

कैलास दवंगेंवरच संशयाची सुई

नाशिकचे तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी काही महिन्यांपूर्वीच भूमाफियांना महसुली व्यवस्थेचा अभय असल्याचे म्हटले होते. त्यांच्या आरोपावरुन महसुली अधिकाऱ्यांना मिरच्या ज्ञोबल्या होत्या. परिणामी त्यांनी निषेधाचे निवेदने देऊन काम बंदचाही इशारा दिला होता. मात्र निर्मला कॉन्छेट जवळील भूखंड परस्पर विक्री प्रकरणात मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवगे यांची पत्नी आणि सासऱ्यांचेच संशयित आरोपी म्हणून नाव आल्याने दीपक पाण्डेय यांच्या दाव्याला पुष्टी मिळाली आहे. कैलास दवंगे आणि नाशिकमधील विशिष्ट बांधकाम व्यावसायिकांशी ‘घनिष्ट संबंध असल्याची चर्चा आहे. महत्वाचे म्हणजे हे प्रकरपा ज्या काळात घडल्याचा दावा करण्यात आला आहे. त्या काळातादवंगे हे नाशिकमध्येच दुय्यम निबंधक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांनी तर अधिकारांचा गैरवापर करुन प्रकरण शिजवले नसावे असा संशय व्यक्त होत आहे.

 

गुन्हा दाखल झाले यांची नावे

चंद्रशेखर माधव अयाचित (वय ७०. रा. एन. डी. पटेलारोड, नाशिक), रेखा ओमप्रकाश सचान, कुणाल ओमप्रकाश सचान, वेदिका ओमप्रकाश सचान, दिलीपकुमार पटेल (५०. रा. शरणपूर रोड, नाशिक). अशोक एकनाथ भिडे, प्रतिमा अशोक भिडे, हितेशकुमार व्दारकादास पटेल (४८), मंदाकिनी श्यामराव केदार(६५), समीर श्यामराव केदार (४४). गिरीश श्यामराव केदार (४१), श्यामराच बळवंत केदार (७२), गोवर्धनभाई पटेल, गंगाराम वालजी भाई पटेल (५५), पोपटलाल पटेल, महावीर चोपडा. रवींद्र पवार. अजय पवार, नरोत्तम पटेल, सुरेश कारे, स्वाती दवंगे, विजय सराफ, फारूक मोतीवाला, पर्ल मोतीवाला, फराक मोतीवाला, सहार मोतीवाला, अकर मोतीवाला, अभिजित भालेराव वा श्रावण शेळके अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

 

“सन २०१६-९७ च्या दरम्यान चंद्रशेखर आयाचित यांनी जागा खरेदी करतांना त्यासंदर्भातील परवानग्या, लेआऊट
एनए ऑर्डर मिळवणे ही प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यातील एक  प्लॉट आयाचित यांनी तेजपात श्रॉफ यांना विकला होता. श्रॉफ यांच्याकडून ऑक्टोबर २००७ मध्ये हा प्लॉट आमच्या सासऱ्यांनी म्हणजे सुरेश कारे यांनी ६ लाख ६६ हजारात खरेदी केला होता. २०१८ मध्ये कौटुंबिक वाटे हिस्स्यात हा फ्लॉट माझी पत्नी स्वाती हिच्या नावाने सासऱ्यांनी केला. थोडक्यात या प्लॉटच्या थेट खरेदीत माझी पत्नी कुठेही नव्हती. यातील संबंधित फिर्यादीची प्रामुख्याने तक्रार चंद्रशेखर अयाचित यांच्याविरुद्ध आहे. परंतु दावा प्रबळ करण्यासाठी ज्यांच्या नावाने जमिनी आहेत. त्यांच्या नावाने तक्रार देण्यात आली आहे” : कैलास दवंगे, मुद्रांक जिल्हाधिकारी, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -