घरताज्या घडामोडीसराईत गुन्हेगार बाबा शेखची गोळ्या घालून हत्या

सराईत गुन्हेगार बाबा शेखची गोळ्या घालून हत्या

Subscribe

भांडण मिटविण्याच्या बहाण्याने बोलावून सराईत गुन्हेगार बाबा शेख याची हल्लेखोरांनी केली हत्या

नाशिक-पुणे महामार्गावरील डीजीपीनगर भागात शनिवारी (दि.१९) रात्री मागील भांडण मिटविण्याच्या कारणातून बोलावून सराईत गुन्हेगार बाबा शेख याची हल्लेखोरांनी गोळया घालून हत्या केली असून सर्वजण फरार झाले आहेत. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड येथील सिन्नरफाटा भागातील बाबा शेख याला शनिवारी(दि.१९) रात्री 9.30 वाजता तोहसीफ उर्फ टिप्पू शेख, समीर खान उर्फ मुर्गीराजा आणि अर्जुन पिवाल यांनी बाबा शेख यास मोबाईलवर कॉल करुन जुने भांडण मिटवायचे असल्याचे सांगत बिटको जवळील रेजिमेंटल थिएटरजवळ बोलावले. त्यानुसार बाबा शेख बोलणी करण्यासाठी दुचाकीवरुन घेऊन जात असताना डिजीपीनगर भागातील साई मंदीराजवळून जात होते. त्यावेळी त्याच्या पाठीत हल्लेखोरांनी गोळी मारली. त्यात ते गंभीर जखमी झाले.

- Advertisement -

जखमी अवस्थेत बाबा शेख याने चुलते इरफान ख्वाजा मोहम्मद शेख याला मोबाईलवर कॉल करुन ’मला टिप्याने व मुर्गी राजाने गोळी मारली आहे, तुम्ही लवकर या’ असे सांगितले, घटनेची माहिती मुंबई नाका पोलिसांनी त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी घेतलेल्या जबाबात बाबा शेख याने संशयितांची नावे सांगितले. रात्री 11.30 वाजेच्या दरम्यान उपचार सुरु असताना बाबा शेख याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. शेख याच्यावर शहरासह विविध पोलीस ठाण्यात खुनासह १५ विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. हल्लेखोरांना जेरबंद करण्यासाठी पथके रवाना झाली आहेत. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पोलीस निरीक्षक कुंदन जाधव करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -