Friday, July 30, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नाशिक पोलिसांची गुन्हेगार सुधार योजना

पोलिसांची गुन्हेगार सुधार योजना

मेळावादरम्यान मानसोपचार तज्ज्ञ, वरिष्ठ पोलीस अधिकारी राहणार उपस्थित

Related Story

- Advertisement -

अनेक गुन्हेगार किंवा आरोपींकडून भावनेच्या भरात अनावधानाने साथीदार किंवा मित्रांसमवेत गुन्हेगारी कृतीमध्ये सहभाग घेतल्यामुळे त्यांच्याविरूध्द गुन्हे दाखल झाले आहेत. काही गुन्हेगार किंवा आरोपींना गुन्हेगारी मार्ग सोडून भविष्यात समाजात सर्वसामान्य जीवन जगण्याची इच्छा असते. मात्र, कायद्याअंतर्गत कारवाई करताना 10 वर्षाच्या गुन्हेगारीचा विचार केला जातो. त्यामुळे ज्या गुन्हेगार किंवा आरोपींना समाजामध्ये चांगले जीवन जगण्याची इच्छा आहे, अशा आरोपींना संधी देण्यासाठी गुन्हेगार सुधार योजना मेळाव्याची सुरूवात सोमवार (दि. 21) दुपारी ४ वाजता सहायक पोलीस आयुक्त विभाग 1 ते 4 मध्ये केली जाणार आहे. मेळावा सुरूवातीला सलग तीन महिने व त्यानंतर तैमासिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र पोलीस नियमावलीनुसार गुन्ह्यांच्या प्रतिबंधाबरोबरच गुन्हेगारांमध्ये सुधारणा करणे हे पोलिसांचे उदिद्ष्ट असावे, या संकल्पनेतून पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय गुन्हेगार सुधार योजना राबविण्याबाबत आदेश निर्गमीत केले आहेत.नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नाशिक शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी ठोस प्रतिबंधक कारवाया केल्या जात आहेत. सामाजिक स्वास्थ्य बिघडविणार्‍या गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. व मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई केली जाते. ज्या गुन्हेगारांना संधी दिल्यास सुधारू शकतात अशा गुन्हेगारांची माहिती घेवुन, अशा गुन्हेगारांनी चांगल्या वर्तणुकीचा बंधपत्र लिहून दिल्यास त्यांना सुधारण्यास वाव दिला जाणार आहेत. समाजातील जबाबदार नागरीक म्हणून ताठ मानेने जीवन जगण्यासाठी संधी या गुन्हेगार सुधार योजने अंतर्गत देण्यात येणार आहे. गुन्हेगार सुधार योजना मेळावादरम्यान मानसोपचार तज्ज्ञ, वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -