घरताज्या घडामोडीनशा करणाऱ्यांना हटकल्याने सिडकोत गुंडांचा हैदोस; ऐन संचारबंदीत दगडफेक, वाहन नुकसानीचे प्रकार

नशा करणाऱ्यांना हटकल्याने सिडकोत गुंडांचा हैदोस; ऐन संचारबंदीत दगडफेक, वाहन नुकसानीचे प्रकार

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असतानाही सिडको भागात टवाळखोर गुंडांचा उपद्रव सुरू आहे. चौकात बसायला विरोध केला म्हणून 15 जणांच्या टोळक्याने थेट परिसरातील नागरिकांच्या घरावर दगडफेक करत दुचाकी, सायकल रस्त्यावर पाडून दहशत निर्माण केली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. गावगुंडांच्या पोलिसांनी मुसक्या आवळाव्यात अशी स्थानिक नागरिक करत आहेत. या घटनेतील टवाळखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.

गुरुवारी दुपारच्या सुमारास सिंहस्थनगर, तुळजा भवानी चौक येथे 15 टवाळखोर अंमली पदार्थाची नशा करत होते. हा एक प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच त्यांना हटकले.  राग अनावर झाल्याने टवाळखोरांनी त्यांच्या साथीदारांना बोलून घेत चौकातील नागरिकांच्या घरावर दगडफेक केली. त्यानंतर रस्त्यातील दुचाकी ढकलून देत त्यांचे नुकसान करीत नागरिकांना शिवीगाळ करून दहशद माजवली. या घटनेनंतर काही नागरिकांनी तक्रारीसाठी अंबड पोलिसात धाव घेतली असता पोलिसांनी तक्रार दाखल केली नाही. त्यानंतर नागरिकांनी पुन्हा वरिष्ठांशी संपर्क साधून घटनेबाबत संशयितांविरोधात तक्रार दाखल केली. घडलेल्या घटनेत तब्बल 15 गुंड असताना पोलिसांनी केवळ चारच संशयित दाखवले. या घटनेबाबत पोलीस गांभीर्य घेत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

पोलिसांची तक्रारदार नागरिकांना शिवीगाळ

गावगुंडांच्या दहशतीबाबत काही नागरिक हिंमत करून समोर आले. ते पोलिसांकडे तक्रार करू लागले. मात्र, या ठिकाणी आलेले पोलीस अधिकारी यांनी नागरिकांकडून घटनेची माहिती घेण्याअगोदरच महिलांसमोर नागरिकांनाच गल्लीच भाषेत शिवीगाळ केली. घटनेनंतर संशयित टवाळखोरांवरवर कारवाई करणे अपेक्षित असतांना पोलिसांनी तक्रारदार नागरिकांनाच अरेरावीची भाषा केली. पोलिसांच्या या भूमिकेबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -