घरमहाराष्ट्रनाशिकयेवल्याच्या शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट

येवल्याच्या शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट

Subscribe

शेतकऱ्यांना अजूनही पावसाची प्रतिक्षाच

ममदापूर । दीपक उगले
येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील अनेक शेतकर्‍यांनी सुरवातीच्या पावसावर पेरणी केली. हवामान विभागाने यावर्षी वेळेपूर्वीच मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला आणि येवला तालुक्यात उत्तर-पूर्व भागात ठिकठिकाणी पाउस होताच शेतकरी पेरणीला लागले. उत्तर पूर्व भागातील अनेक शेतकर्‍यांनी पेरणी पुर्व मशागत करून मका, बाजरी, मूग, कपाशी लागवड केली. आता पावसाची नितांत आवश्यकता आहे.

मात्र पाऊस लांबला. त्यामुळे झालेली पेरणी दुबार होऊ शकते पेरणी उलटण्याचा धोका वाढला आहे.उत्तर पूर्व भागात यावर्षी ठिकठिकाणी खरिपाची पेरणी झाली आहे. अनेक ठिकाणीं अद्याप पेरणी योग्य पाऊस झाला नाही. पावसाळ्याला सर्वात झाली आहे. या आशेने याच स्थितीत काही शेतकर्‍यांनी मोठी रिस्क स्वीकारून मका, बाजरी, मूग, पेरणी केली व कपाशीची लागवड केली. आता पावसाची नितांत आवश्यकता आहे. मात्र पाऊस सतत लांबत आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहे.पर्जन्य होत नसल्याने यातून शेतकर्‍यांना मोठा फटका बसण्याचा धोका आहे. मान्सूनची आगेकूच संथगतीने असल्याने अजूनही १०० मि.मी. पाऊस झाला नाही.अशा स्थितीत पेरणी उलटण्याचा धोका वाढला आहे. राजापुर, ममदापूर, देवदरी सह परिसरात ठिकठिकाणी पेरणी झाली आहे.

- Advertisement -

यावर्षी पाऊस वेळेत दाखल होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले होते. मात्र, पावसाने अजुनही चांगली हजेरी लावलेली नाही. तालुक्यातील सर्वच भागात खरीपपूर्व शेतीकामांना वेग आला आहे. रखरखत्या उन्हातही शेतकर्‍यांनी मशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे. यात बैलजोडी आणि ट्रॅक्टरने मशागत केली आहे. पंरतु, पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी पेरणीसाठी पावसाची वाट पाहत आहे. मागीलवर्षी मोसमी पावसाने शेतातील पिकांचे अतोनात नुकसान केल्याने शेतकरी अडचणीत आला होता. यंदाच्या खरीपात तरी निसर्ग साथ देईल आणि शेतीतून काहीतरी उत्पन्न हाती येईल, अशी अपेक्षा आहे. शेतकरी मशागतीत व्यस्त आहेत. पावसाअभावी शेतकामातही शेतकर्‍यांचे मन लागत नाही.

शेतकर्‍यांनी ८०-१०० मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणीसाठी शेतजमिनीत योग्य ती ओल झाल्यावरच खरिपाची पेरणी करावी. अधिक घाई झाली, तर दुबार पेरणीचे संकट येऊ शकते!!. शेतकर्‍यांनी पाऊस बरसल्यानंतरच पेरणी करावी. – कारभारी नवले, तालुका कृषि अधिकारी येवला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -