घरमहाराष्ट्रनाशिकपावसाचा धुमाकूळ : नांदगावसह येवला, दिंडोरीत पिकांचं मोठं नुकसान

पावसाचा धुमाकूळ : नांदगावसह येवला, दिंडोरीत पिकांचं मोठं नुकसान

Subscribe

परतलेल्या पावसाने वाढवली बळीराजाची चिंता

गणेश विसर्जनानंतर थांबलेला पाऊस पुन्हा एकदा परतलाय. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसाने आज चांगलाच जोर धरला होता. पहाटेपासून सायंकाळपर्यंत सुरू असलेल्या या पावसामुळे नदी-नाल्यांसह गोदावरीच्या पाणी पातळीतही वाढ झाली. या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, जिल्ह्याच्या नांदगाव, निफाड, दिंडोरी तालुक्यातही आज दमदार पाऊस बरसला. त्यामुळे खरिपाच्या पिकांना चांगलाच तडाखा बसला. टोमॅटो, कांद्यासह पालेभाज्यांचं यात नुकसान झालं. काढणीला आलेल्या पिकांसह शेडमध्ये साठवलेल्या कांद्याचंही या पावसाने नुकसान केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -