घरताज्या घडामोडीटोकन देऊनही तळीरांची दुकानांसमोर गर्दी

टोकन देऊनही तळीरांची दुकानांसमोर गर्दी

Subscribe

मद्य विक्री दुकानांसमोर तळीरामांची गर्दी होवू नये, यासाठी प्रशासनाने एसएमस व व्हॉट्सअ‍ॅप टोकन पद्धतीचा अवंलब करण्याचे आदेश दुकानदारांना दिले आहेत. त्यानुसार दुकानासमोर मोबाईल व व्हॉट्सऍप क्रमांक असलेले फलक लावण्यात आलेले असतानाही तळीरामांनी दुकानासमोर गर्दी केली. अनेकांनी सोशल डिस्टन्स न ठेवता नंबर येईपर्यंत दुकानाच्या परिसरात थांबले होते. पोलिसांनी दुकानांसमोर बंदोबस्त ठेवल्याने शहरात किरकोळ वाद वगळता सर्वत्र शांततेत मद्य विक्री झाली.

गत आठवड्यात मद्य दुकाने सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाच्या घेतला होता. मात्र, तळीरामांच्या गर्दीमुळे मद्य दुकाने अवघ्या दोन तासात बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना काढले होते. शुक्रवारपासून (दि.८) मद्य विक्री दुकाने सुरू करत ग्राहकांना टोकन पद्धतीनुसार मद्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारी (दि.८) शहर व जिल्ह्यात बिअर बार वगळता सर्व मद्य विक्रीची दुकाने पुन्हा सुरू झाली.

- Advertisement -

गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने एसएमस व व्हॉट्सअ‍ॅप टोकन पद्धतीचा अवंलब करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक मद्य दुकानासमोर मोबाईल व व्हॉट्सऍप क्रमांक असलेले फलक लावण्यात आले आहेत. त्यावरच ग्राहकाने मागणी नोंदवयाची आहे. या नोंदणीची दखल घेऊन मद्य विक्री करणारे ग्राहकाला ठराविक वेळ निर्धारीत करून त्यास बोलवले जात आहे. त्याच वेळेत ग्राहकाने दुकानात जाऊन मद्य घ्यायचे असल्याने दुकानदार खासगी सुरक्षारक्षकांकडून सामाजिक अंतर व रांगेचे नियम पाळतील असे आदेश होते. मात्र, शुक्रवारी शहरातील अनेक दुकानांसमोर मोबाईल क्रमांक मिळवण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. दुरवरून आलेले ग्राहक नोंदणी केल्यानंतर पुन्हा घरी न जाता दुकानाच्या परिसरात थांबले. मद्य विक्रेत्याचे सुरक्षा रक्षक तैनात असले तरी गर्दी नियंत्रणात नव्हती, अनेकांनी सामाजिक अंतर ठेवले नाही. अनेक ठिकाणी वादही झाले. अखेर शहरात नागरीकांची गर्दी असतानाही तपासणीनाके सोडून मद्यच्या दुकानांना पोलीस बंदोबस्त द्यावा लागला. अनेक ठिकाणी पोलीसच रांगा लावण्यासह सर्व कामे करताना दिसत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -