घरमहाराष्ट्रनाशिकमोबाईल दुकानांमध्ये तोबा गर्दी, पोलिसांकडून कारवाई

मोबाईल दुकानांमध्ये तोबा गर्दी, पोलिसांकडून कारवाई

Subscribe

महात्मा गांधी रोडवरील प्रधानपार्कसह गर्दीच्या अन्य ठिकाणीही पोलिसांनी केली कारवाई

कोरोनाचा विस्फोट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लागू केलेले निर्बंध शिथिल होताच बुधवारी (दि.२) महात्मा गांधी रोडवरील मोबाईल दुकानांमध्ये ग्राहकांची तोबा गर्दी झाली होती. ही माहिती मिळताच पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह धाव घेत तातडीने ही दुकाने बंद केली. दरम्यान, ज्या कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये एकाच प्रकारची अनेक दुकाने असतील आणि त्या ठिकाणी गर्दी होत असेल तर त्या ठिकाणीही कारवाई केली जाईल, असा इशारा उपायुक्त तांबे यांनी दिला.

कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येताच शहरातील निर्बंध शिथिल करतांना सर्व व्यावसायिकांना सकाळी ७ ते दुपारी २ व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. मात्र पहिल्याच दिवशी बाजारपेठांमध्ये झालेली गर्दी पाहता प्रशासनाला निर्बंधांबाबत फेरविचार करण्याची वेळ आली आहे तसा इशाराही जिल्हाधिकारयांनी दिला आहे. शहरातील महात्मा गांधी रोड तसेच वकीलवाडी ते अशोकस्तंभ परिसरातील संकुलांमध्ये मोबाईलची दुकाने आहेत. मात्र या दूकानांमध्ये अक्षरशः गर्दीचा महापूर दिसून आला.

- Advertisement -

प्रधान पार्क, वकिलवाडीतील मोबाईल दुकानांमध्ये झालेली गर्दी पाहता हे तिसरया लाटेला आमंत्रण देण्यासारखे आहे. या संकुलात होणारया गर्दीमुळे कोरोना नियमांचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले. तसेच, संकुलासमोरच वाहने उभी केली जात असल्याने मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडीही निर्माण होत आहे. बुधवारी सकाळी मोबाईल अ‍ॅक्सेसरीज् खरेदी, रिपेअरिंगसाठी तरूणाईची अक्षरशः झुंबड उडाली होती. या मोबाईल मार्केटमध्ये कोरोना नियमांचे पालन होत नसल्याने  मोबाईल दूकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी पोलिसांनी येथे दाखल होत व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास सांगितली. पुढील आदेश येईपर्यंत ही दुकाने बंदच ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


एकाच ठिकाणी दुकाने असल्याने गर्दी मोठया प्रमाणावर होते. गर्दीवर नियंत्रण राहत नाही. यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे. शासनाने शॉपिंग सेंटर बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे प्रधान पार्क संकुल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. – हेमंत सोमवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सरकारवाडा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -