घरक्राइमनाशकात वाढताहेत सायबर गुन्हे

नाशकात वाढताहेत सायबर गुन्हे

Subscribe

ऑनलाईन पेमेंटचे गुन्हे वाढले, १० महिन्यांत ३ कोटी ३६ लाखांना गंडा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून ऑनलाईन पेमेंट प्रणालीला प्रोत्साहन दिले जात असताना दुसरीकडे याच प्रणालीत सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. दहा महिन्यांच्या काळात ऑनलाईन पेमेंटच्या नावाने तब्बल १३ प्रकरणांत फसवणूक करण्यात आली आहे. याशिवाय या काळात विविध मार्गाने ७० हून अधिक नागरिकांची सायबर फसवणूक झाली असून त्यात तब्बल ३ कोटी ३६ लाख २७ हजार रुपयांना चंदन लागले आहे.

नाशिक शहरात सायबर गुन्ह्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि स्मार्ट मोबाईलमुळे जग जवळ आले असले तरी आधारकार्ड, पॅन कार्ड अपडेट केले नाही तर तुमचे बँक अकाऊंट बंद होईल, असा धाक दाखवून सायबर गुन्हेगारांनी नागरिकांना फसवल्याचे समोर आले आहे. बँक अधिकारी असल्याचे भासवून ग्राहकांशी संपर्क साधत डेबिट, क्रेडिट कार्डविषयी गोपनीय माहिती मिळवली जात आहे. गुगल पे, फोन पे रिवॉर्डसचे आमिष दाखवून विश्वास संपादन करत चोरट्यांनी तब्बल ३ कोटी ३६ लाख रुपयांना गंडा घातला आहे. इंटरनेटमुळे माहितीचा खजिना काही सेकंदात उपलब्ध होत आहे. आर्थिक व्यवहार माहितीचे आदान-प्रदान आणि विविध प्रकारच्या महत्वपूर्ण प्रणालीच्या निमित्ताने इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढला आहे. त्यात गतीने इंटरनेटचा गैरवापर करणार्‍यांचीही संख्या वाढली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊन काळात सायबर चोरट्यांनी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या बँक खात्यावरील रक्कम ऑनलाईन गायब केली. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये सायबर गुन्ह्यांचा आलेख वाढता आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर सायबर गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ सुरु आहे. त्यामुळे नागरिकांनी फसव्या कॉलपासून सावध गरजेचे झाले आहे.

- Advertisement -

शहरात सायबर गुन्हेगारीत वाढ झाली आहे. क्युआर कोड, लिंक ओपन करु नये. बनावट कॉल, ईमेल, मेसेजला प्रतिसाद देवू नये. आकर्षक ऑफर्स दाखवणार्‍या ईमेलकडे दुर्लक्ष करावे. ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण सर्वाधिक शहरी भागात आहे. कोणत्याही आमिषांना बळू पडू नये. मदतीसाठी सायबर पोलिसांशी संपर्क साधा.

– श्रीपाद परोपकारी, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे

- Advertisement -

सायबर पोलिसांकडे दाखल गुन्ह्यांची संख्या

विनयभंग – ९
क्युआर कोडव्दारे फसवणूक – ७
कुरियर पार्सल – २
बक्षीस – १
केवायसी अपडेट – ४
एटीम क्लोनिंग – २
लष्करातील सैनिक – २
एटीम स्वॅप – २
फेसबुक, इंस्टाग्रॅम – ३
गुगल पे, फोन पे रिवॉर्ड – १३

अशी घ्या खबरदारी..

अनोळखी नंबरवरुन मेसेज आल्यास त्यातील लिंक क्लिक करु नये. +९० कोडने अनेकांना कॉल आले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले जात आहे. नागरिकांनी या बनावट कॉल व मेसेजपासून सावध रहावे. अनलिमिटेड डेटाचे आमिष दाखविणारे मेसेज अनेकांना प्राप्त होत असल्याने त्याकडे दुर्लक्ष करावे. तक्रार आणि माहितीसाठी सायबर पोलीस व शहर पोलिसांशी संपर्क साधा. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला १०० क्रमांकावर कॉल करुन माहिती द्यावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -