घरमहाराष्ट्रनाशिकपिंपळगाव टोलनाक्यावर संस्थाचालकाची दबंगगिरी

पिंपळगाव टोलनाक्यावर संस्थाचालकाची दबंगगिरी

Subscribe

धक्का लागल्याने बसचालकाला हातात पिस्तूल घेऊन भरला दम;सोशल मीडियावर व्हीडीयो व्हायरल

पिंपळगाव बसवंत येथील पीएनजी टोल नाक्यावर एसटी बसचा धक्का लागल्याने माजी शिक्षक डीएड कॉलेजचा संस्थाचालकाने चक्क हातात पिस्तूल घेवून बसचालकाला अरेरावी करत दबंगिरी केल्याचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकाराबाबत अद्यापही पिंपळगाव पोलीस ठाण्यात कुठलाही गुन्हा दाखल नसल्याची माहिती मिळत आहे.

दोन दिवसापूर्वी रविवारी डिएड कॉलेजचे संस्थाचालक मनोज निकम हे पत्नीसह नाशिक जिल्ह्यातील देवळा येथे लग्नासाठी जात असताना पिंपळगाव बसवंत येथील टोलनाक्यावर त्यांच्या गाडीला बसचा जोरदार धक्का लागला. संतापाच्या भरात जवळच असलेली पिस्तूल हातात घेऊन अरेरावी केल्याचा व्हिडिओ बसमध्ये बसलेल्या प्रवासाने चित्रीत केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. आठ वर्षांपूर्वी संस्थाचालक निकम हे लासलगाव येथील लासलगाव शिक्षण सहायक मंडळ संचालित असलेल्या लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. सध्या तो नाशिक येथे वास्तव्यास असून नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील साक्री येथे त्यांचे डीएडचे कॉलेज आहे.

- Advertisement -

स्व:संरक्षणासाठी असलेली रिव्हाल्वर जवळ बाळगली

बसचालकाने गाडीला जोरदार धडक दिल्याने व अरेरावी केल्यामुळे खाली उतरलो आणि संताप अनावर झाला. यावेळी स्व:संरक्षणासाठीची रिव्हाल्वर गाडीत सोडण्याऐवजी जवळच बाळगल्याने व्हिडिओमध्ये चित्रित झाली. व्हिडिओमध्ये बसचालकावर रिव्हाल्वर ताणलेली दिसत नसून किंवा दम दिलेला दिसत नाही. चालकाने पिंपळगाव पोलिसात गुन्हा दाखल केला नाही, हे यावरून सिद्ध होते. – मनोज निकम, संस्थाचालक

पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर पिस्तूल दाखवून दबंगगिरी

पिंपळगाव बसवंत (नाशिक) टोल नाक्यावर डीएड कॉलेजच्या संस्थाचालकाने हातात पिस्तूल घेवून बसचालकाला दमदाटी केली

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಜುಲೈ 16, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -