यूपीएससी परीक्षेला 988 परीक्षार्थींची दांडी

तीन हजार 445 उमेदवारांपैकी 2474 उमेदवारांनी परीक्षा दिली.

mht-cet 2021 uday samant announces CET re exam who missed exam due to rain and flood

नाशिक : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी रविवारी (दि.10) परीक्षा घेण्यात आली. यात जनरल स्टडीज पेपर एकसाठी एकूण तीन हजार 445 उमेदवारांपैकी 2474 उमेदवारांनी परीक्षा दिली. तर 971 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले. तर पेपर दोनसाठी 2457 विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली. तर 988 विद्यार्थ्यांनी दांडी मारली.
युपीएससीच्या परीक्षेसाठी नाशिकमध्ये केंद्र मंजूर झाल्यानंतर प्रथमच नागरी सेवा पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आल्याने उमेदवारांकडून स्वागत करण्यात आले. यापूर्वी परीक्षेसाठी परत जिल्ह्यात जावे लागत असल्याने दोन ते तीन दिवस वेळ घालवावा लागायचा. त्यामुळे प्रथमच नाशिकमध्ये परीक्षा झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. परीक्षेचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्यात आल्याचे परीक्षार्थीनी सांगितले कोरोना च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले. मास्कचा वापर तसेच सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले होते. सी सॅट पेपरच्या तुलनेत जनरल स्टडीज पेपर मधील प्रश्नांची काठिण्य पातळी जास्त असल्याने उमेदवारांची कसोटी लागली होती.राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षानंतर राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणार्‍या अनेक महत्वाच्या परीक्षा नाशिकमध्ये यशस्वीरित्या घेतल्या जात आहे. नाशिकमध्ये केंद्र सुरु व्हावे, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले.