घरक्राइमदाणी, मनियार, कोष्टीच्या जाचाला कंटाळून घंटागाडी कर्मचार्‍याची आत्महत्या

दाणी, मनियार, कोष्टीच्या जाचाला कंटाळून घंटागाडी कर्मचार्‍याची आत्महत्या

Subscribe

नाशिकरोड : महापालिकेच्या घंटागाडी कर्मचार्‍याने दाणी, मनियार व कोष्टी या तीन सुपरवायझरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.२०) उघडकीस आली किरण माणिक पुराणे (वय 29, रा. आगर टाकळी गाव, उपनगर) असे आत्महत्या करणार्‍या कर्मचार्‍याचे नाव आहे. दरम्यान, पुराणे याने आत्महत्या करण्यापूर्वी जाचाचा मेसेज सोशल मिडियावर सेंड केला होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, किरण हा महापालिकेत कंत्राटी पद्धतीने घंटागाडी कर्मचारी होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपनगर पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी, कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. किरण याने दाणी, मनियार व कोष्टी या तीन संशयितांची नावे संदेश लिहून तिघांनी छळ केल्याचे म्हटले आहे. ठेकेदार आणि सुपरवायझर दरमहा पाच हजार रुपये तर दरवर्षी 60 हजार रुपये मागत असल्याचे पुराणे याने मेसेजमध्ये म्हटले आहे. तसेच, याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांकडेही तक्रार केल्यानंतरही त्रास देणे सुरूच होते. या त्रासामुळेच हे कृत्य करीत असल्याचे या मेजेजमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

या घटनेमुळे जिल्हा शासकीय रूग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त नातलग व घंटागाडी कर्मचार्‍यांनी आक्रमक भूमिका घेत व्हायरल संदेशात ज्यांची नावे घेतली आहेत, त्यांना अटक करण्याची मागणी केली. तसेच, नातेवाईकांनी पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. प्राथमिक स्वरुपात घटनेची नोंद करण्यात आलेली आहे.

’सिव्हिल’मध्ये तणाव

तिघा संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घंटागाडी कर्मचारी संघटना व पदाधिकारी व नातलगांनी घेतला. यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मध्यस्थी होत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने तणाव कमी झाला.

घंटागाडीवर काम करणार्‍या भाऊ करणने दर महिन्याला पाच हजार रुपयांची मागणी करणारे तीन सुपरवायझरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. दोषींवर कठोर कारवाई व्हावी. : बाजीराव पुराणे, मृताचा भाऊ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -