आरोग्य विभागाच्या परीक्षेला अखेर मुहूर्त

गट ‘क’साठी २४ रोजी तर गट ‘ड’ची ३१ रोजी परीक्षा

helth deparment exam

नाशिक :आरोग्य विभागाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या परिक्षांचा गोंधळ निर्माण झाला होता.मात्र आता या परीक्षांचे नियोजन करण्यात येऊन गट-क संवर्गाची लेखी परीक्षा २४ ऑक्टोबरला, तर गट-ड संवर्गाची लेखी परीक्षा ३१ रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली आहे.

राज्यात गट-क संवर्गाचे २ हजार ७३९ व गट-ड संवर्गाचे ३ हजार ४६६ पदांची, असे एकूण ६ हजार २०५ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. परीक्षा घेणार्‍या न्यासा या कंपनीस सर्व उमेदवारांना प्रवेश पत्र ईमेल, व्हाटस-अप मोबाईलवर पाठवून देण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. कंपनीद्वारे केल्या जाणारी बैठक व्यवस्था, केंद्राचे आरक्षण, कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बैठक व्यवस्थेचे नियोजन, केंद्रामध्ये जॅमर बसविणे, प्रवेश पत्र निर्गमित करणे, प्रश्नपत्रिकांचे वाटप आदी न्यासा कंपनीमार्फत केले जात आहे. नाशिकमध्ये गट-क मधील ६८ हजार ६८६ उमेदवार परीक्षा देणार असून तिन्ही जिल्ह्यातील एकूण १४२ परीक्षा केंद्रांवर उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा प्रथम सत्रात १८ हजार ८७, द्वितीय सत्रात १८ हजार १८३ उमेदवार परीक्षा देणार आहेत. जळगावमध्ये द्वितीय सत्रात १४ हजार ७४८ तर नगर जिल्ह्यात द्वितीय सत्रात १७ हजार ६६८ उमेदवार परीक्षा देणार आहेत.

मदतकक्षाची निर्मिती 

आरोग्य उपसंचालक नाशिक या कार्यालयात न्यासा कम्युनिकेशन या कंपनीने दोन प्रतिनिधी नेमून हेल्प डेस्क स्थापन केलेले असून प्रवेश पत्र व इतर शंकाचे निरसन करण्यासाठी उमेदवारांनी ९५१३३ १५५३५ , ७२९२०१३५५०, ९५१३५००२०३ क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन डॉ. गांडाळ यांनी केले आहे.