Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक विहिरीत आढळला मृतदेह, खूनाचा प्रकार उघडकीस

विहिरीत आढळला मृतदेह, खूनाचा प्रकार उघडकीस

वडाळागावात उघडकीस आली धक्कादायक घटना, ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर आव्हान

Related Story

- Advertisement -

‌वडाळागाव परिसरातील अण्णाभाऊ साठेनगरजवळ निर्जन भागातील साळवे मळ्याच्या पडीक विहिरीत शनिवारी (दि.२४) सकाळी शेतकऱ्याला एका पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकल्याचे दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेह कुजलेला असल्याने ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

या अनोळखी पुरुषाचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळून खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. साळवे मळ्यात सकाळी हिरामण साळवे हे गेले असता त्यांना विहिरीतून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले. विहिरीत जनावर असावे, या अंदाजाने त्यांनी धाव घेतली. मात्र, डोकावून पाहिले असता पाण्यावर मृतदेह तरंगत असल्याचे धक्कादायक चित्र त्यांना दिसले. त्यांनी यासंदर्भातील माहिती तत्काळ इंदिरानगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अग्नीशमन दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. या व्यक्तीचा गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून दिला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -