घरक्राइमपंचवटीत आढळला युवकाचा मृतदेह

पंचवटीत आढळला युवकाचा मृतदेह

Subscribe

घातापाताचा संशय: पंचवटी पोलीसांत आकस्मित मृत्युची नोंद

पंचवटीतील वाघाडी परिसरात असलेल्या वाल्मिक नगर मध्ये शनीवारी(दि.१२) सकाळी एका युवकाचा संशयास्पद मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या युवकाचा घातपात झाला की नैसर्गिक मृत्य झाला या बाबत शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर उघड होईल अशी माहिती पंचवटी पोलिसांनी दिली आहे.

याबाबत पंचवटी पोलिसांनी दिलेली अधिकृत माहिती अशी की योगेश सोमनाथ भगत( वय.२५ रा.दामोदर नगर,हिरावाडी, पंचवटी) हा आज सकाळी वाल्मिक नगर परिसरात मयत अवस्थेत आढळून आल्याने परिसरातील नागरिकांनी पंचवटी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

वाघाडी येथे युवकाचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी आलो असता युवकाच्या खिशात आधारकार्ड मिळाले. हा युवक हिरावाडी साईकिरण सोसायटी येथील रहीवासी आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यु कशामुळे झाला याचे नमके कारण समजू शकेल.
-अशोक भगत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंचवटी पोलीस ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -