घरमहाराष्ट्रनाशिकपिंपळस येथे वीज पडून युवतीचा मृत्यू

पिंपळस येथे वीज पडून युवतीचा मृत्यू

Subscribe

जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेत रुपालीच्या कुटुंबीयांना जाहीर केली चार लाखांची मदत

पिंपळस येथे गुरुवारी, २७ जूनला दुपारी विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्यात निफाड तालुक्यातील सुकेणे येथे शेतात काम करणाऱ्या रुपाली भोई हिचा (वय १७) हिचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या घटनेची तातडीने दखल घेत रुपालीच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत जाहीर केली.

नाशिक शहरासह जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. दुष्काळाने त्रस्त नागरिकांना या पावसाने दिला असतानाच, दुसरीकडे वादळी-वारा व विजांमुळे हा पाऊस नुकसानदायीदेखील ठरतो आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रचंड नुकसान केलेल्या या पावसाने गुरुवारी रुपालीचा बळी घेतला. या घटनेमुळे भोई कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -