घरमहाराष्ट्रनाशिक४२८ मेट्रिक टन कांद्याचे निर्जलीकरण

४२८ मेट्रिक टन कांद्याचे निर्जलीकरण

Subscribe

लासलगाव येथील भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरने (बीएआरसी) चालू आर्थिक वर्षात ४२८ मैट्रिक टन खरीप आणि लेट खरीप कांद्यावर प्रक्रिया केली. प्रक्रिया केलेला हा कांदा अमेरिका आणि युरोपियन देशांना निर्यात केला गेला.

लासलगाव येथील भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरने (बीएआरसी) चालू आर्थिक वर्षात ४२८ मैट्रिक टन खरीप आणि लेट खरीप कांद्यावर प्रक्रिया केली. प्रक्रिया केलेला हा कांदा अमेरिका आणि युरोपियन देशांना निर्यात केला गेला. कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये एक ३१ ऑक्टोबर २००२ मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या येथील कृषक येथे हा प्रकल्प कांद्यासाठी तयार केला होता. महाराष्ट्रात एक प्रकल्प वाशी तर, दुसरा लासलगावमध्ये आहे.

सदर प्रकल्प बीएआरसी आणि त्यानंतर पणन महामंडळाने चालवला. मात्र, या दोघा संस्थांना अपेक्षित उद्दिष्ट गाठता आले नाही. यानंतर बीएआरसी या संस्थेने ऍग्रो सर्ज इरिडेशन प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई यांना २०१५ पासून हा प्रकल्प भाडेतत्त्वावर दिला आणि या संस्थेने आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ४२८ मेट्रिक टन कांदा निर्जलीकरनाची प्रक्रिया करून ज्या उद्दिष्टासाठी हा प्रकल्प लासलगाव मध्ये आला ते साध्य केले. या सेंटरमध्ये कांद्यावर निर्जलीकरण करून कांद्याची टिकवणक्षमता २० ते २५ दिवसाने वाढवली आणि सदरचा कांदा लासलगावमार्गे अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांमध्ये निर्यात केला आहे.

- Advertisement -

येथील संशोधन केंद्रावर तासाला पाच मेट्रिक टन कांदा प्रक्रिया केली जाते. याबरोबर आंबा, लसुण, मसाले, कांदा पावडर, आयुर्वेदिक चुर्ण, डाळिंब, बटाटा, दाळी, कलर यांच्यावर देखील प्रक्रिया केली जाते. येथील ऍग्रो सर्ज कंपनीद्वारे मध्ये तीन शिपमध्ये २४ तास निर्जलीकरण प्रक्रियेचे काम चालते. हा प्रकल्प चालू झाल्या पासून २०१८-१९ मध्ये प्रथमता २१५७ मेट्रिक टन पदार्थांवर निर्जलीकरण करण्याची प्रक्रिया केली आहे. खासगी कंपनीने चालवल्या जाणार्‍या विकिरण प्रकल्पामुळे हे उद्दिष्ट गाठता आले आहे, अशी माहिती प्रकल्पप्रमुख प्रणव पारेख, महेंद्र अवधाने, संजय आहेर यांनी दिली.

विकिरण प्रक्रिया म्हणजे?

गॅमा किरणांचा मारा करून कांदा साठवणूक क्षमता वाढवली जाते. यामुळे कांदा टिकण्याची क्रिया लांबते. येथून कांद्यावर विकिरण प्रक्रिया पूर्ण करून हा कांदा अमेरिका, आखाती देश आणि युरोपियन राष्ट्रात निर्यात केला गेला.

  • २०१५-१६ – ६८८ मैट्रिक टन
  • २०१६-१७ – १९५८ मैट्रिक टन
  • २०१७-१८ – १९४९ मैट्रिक टन
  • २०१८-१९- २१५७ मैट्रिक टन
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -