घरमहाराष्ट्रनाशिकतरुणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी तरुणावर खून, बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

तरुणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी तरुणावर खून, बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Subscribe

सिन्नरमध्ये आंदोलन करत सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांची मागणी

नाशिक : सिन्नरमधील २६ वर्षीय युवतीचा मृत्यू संशयास्पद आहे. तिने आत्महत्या केली नसून, तिचा खून करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित तरुणावर खून व बलात्काराचा गुन्हा दाखल करावा, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा, अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी मोर्चाव्दारे केली.

किरण राजू सानप (वय २६) हिच्या मृत्यूप्रकरणी शुक्रवारी (दि.७) दुपारी एक वाजेदरम्यान वावी वेस येथून बसस्थानकापर्यंत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. सिन्नर बसस्थानकासमोर निदर्शने करण्यात आली. पोलीस संशयिताला बचावाची संधी देत आहेत. हा प्रकार लव्ह जिहादचा आहे, असा आरोप यावेळी पदाधिकार्‍यांनी केली.

- Advertisement -

२८ डिसेंबर रोजी ती ही राहत्या घरात मृतावस्थेत आढळली. ही बाब शेजारील नागरिकांच्या लक्षात आली. नगरसेवकांनी पोलिसांशी संपर्क साधत माहिती दिली. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. तिची आत्महत्या नसून, तिचा लव्ह जिहादप्रकरणातून खून करण्यात आला आहे. पोलीस गणेश परदेशी हे आरोपीला वाचवत होते. परदेशी यांना निलंबित करण्यात यावे.

आरोपीवरील खूनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा, अशी मागणी पदाधिकार्‍यांनी केली. यावेळी मागणीचे निवेदन अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांना देण्यात आले. यावेळी आमदार सीमा हिरे, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी, उद्य सांगळे, जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, सामाजिक कार्यकर्ते अंजिक्य गिते, धनराज गुट्टे आदी उपस्थित होते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -