घरमहाराष्ट्रनाशिकपिंपळगाव टोलनाका कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी

पिंपळगाव टोलनाका कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी

Subscribe

नाशिक : पिंपळगाव टोल नाक्यावरील कर्मचार्‍यांकडून वाहनचालकांना दमदाटी होत असल्याची घटना ताजी असतानाच आता दोन महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वारंवार घडणार्‍या अशा घटनांमुळे पिंपळगाव बसवंत टोकनाका कायमस्वरुपी बंद करावा, अशी मागणी मनसे पदाधिकार्‍यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांकडे केली.

पिंपळगाव टोल नाका राज्यभरात वादग्रस्त टोलनाका बनला आहे. पिंपळगाव टोलनाक्यावर अशा घटना रोजच्याच असल्याने स्थानिकांचे म्हणणे आहे. इथले कर्मचारी नेहमीच वाहनचालकांशी अरेरावी करतात. घोटी ते चांदवड या अवघ्या 70 किमी अंतरावर 3 टोल नाके असून गैरवर्तणुकीच्या या अगोदर आलेल्या अनेक तक्रारींची चौकशी करून हा टोलनाका तात्काळ 7 दिवसांत कायमस्वरुपी बंद करण्यात यावा, अन्यथा याविरोधात तीव्र स्वरुपाचे आंदोलन उभारण्यात येईल, अशा मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना देण्यात आले.

- Advertisement -

मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, महिला प्रदेश उपाध्यक्षा सुजाता डेरे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके, प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, संघटक अतुल पाटील, महानगर संघटक विजय आहिरे, निफाड तालुकाध्यक्ष संजय मोरे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष संपत वक्ते, निफाड शहराध्यक्ष तुषार गांगुर्डे, शहर संघटक अमित गांगुर्डे व संजय देवरे, सहकार सेना शहराध्यक्षा अक्षरा घोडके यांची स्वाक्षरी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -