घरक्राइमशरीरसुखाची मागणी : तरुणीने दीड हजार घेत भरस्त्यात केली धुलाई

शरीरसुखाची मागणी : तरुणीने दीड हजार घेत भरस्त्यात केली धुलाई

Subscribe

पंचवटी : अनोळखी तरुणीकडे मेसेजव्दारे शरीरसुखाची मागणी करुन भेटणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. शरीर संबंधासाठी तरुणीने एका तरुणाकडून दीड हजार रुपये घेतल्यानंतर चार साथीदारांच्या मदतीने तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाल्मिक दादाराव अहिरे (वय २५, रा. कोणार्क नगर, आडगाव) याने पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी २३ वर्षीय तरुणीसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. विकी रमेश पाथरे (वय २८), सनी रमेश पाथरे (२८), चंदन सेवकराम नागराणी (२७) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्मिक अहिरे याने दोन दिवसांपूर्वी ओळखीच्या तरुणीकडे शरीर संबंधासाठी तरुणीची गरज असल्याचे सांगितले. तिने तिच्या एका ओळखीच्या तरुणीचा मोबाईल क्रमांक दिला. त्या क्रमांकावर वाल्मिकने मेसेज करत शरीरसुखाची मागणी केली. तरुणीने त्याच्याकडे २ हजार रुपयांची मागणी केली. तडजोतीअंती दीड हजार रुपये देण्याचे ठरवून पंचवटी परिसरातील इंद्रकुंड येथे भेटण्याचे ठरले.
बुधवारी (दि. १६) दुपारी ३ वाजता संबंधित तरुणीने वाल्मिक यास कॉल करून इंद्रकुंड येथे बोलावले. तो इंद्रकुंड येथे आल्यावर संबंधित मुलीने सुरुवातीला त्याच्याकडून दीड हजार रुपये घेतले. त्यानंतर तिने कॉल करून चार साथीदारांना बोलावून घेतले. कार (एमएच १५ सीडी २९७६)ने चौघेजण इंद्रकुंड परिसरात आले. तुला शरीर संबंधासाठी मुलगी हवी आहे काय, असे म्हणत चौघांनी वाल्मिकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यातील एकाने कारमधून लाकडी दांडका काढून वाल्मिकला मारहाण केली. मारहाण रस्त्यात सुरु असल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. त्यानंतर मारहाण करणार्‍या दोन तरुणांसह तरुणीने वाल्मिकला रिक्षात बसवून पंचवटी पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी गंभीर मारहाण झाल्याचे पाहून वाल्मिकला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. विचारपूस केली असता त्याने आपबिती सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून युवतीसह चौघांवर गुन्हा मारहाणीचा गुन्हा दाखल केला.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -