घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअडचणी दूर करून विमानसेवा सुरळीत करा

अडचणी दूर करून विमानसेवा सुरळीत करा

Subscribe

आ.आशुतोष काळेंकडून विमान प्राधिकरण अधिकार्‍यांची झाडाझडती

शिर्डी : मागील आठवड्यात शिर्डी विमानतळावरून सुरु झालेल्या विमानसेवेमध्ये अडथळे येत असून दृश्यमानता कमी असल्यामुळे विमानांना उतरण्यास अडचणी येत आहेत. काकडी विमानतळावर उतरणारे विमान मुंबई विमानतळावर उतरविण्यात आले होते. त्यामुळे विमान प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण पसरले आहे. विमान प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी याची दखल घेऊन काकडी विमानतळावर विविध कंपनीच्या विमानांना येणार्‍या अडचणी तातडीने दूर करून विमानसेवा सुरळीत करावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी शिर्डी (काकडी) विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

जगभरातील साई भक्तांना शिर्डी येथे येण्यासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे शिर्डी विमानतळाची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे काकडीसह पंचक्रोशीच्या गावातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या मात्र विमान प्राधिकरणाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे काकडी विमानतळ समस्येच्या गर्तेत अडकले आहे. त्याबाबत आ. काळे यांनी नुकतीच विमान प्राधिकरण व विविध विमान कंपन्यांच्या अधिकार्‍यांसमवेत काकडी विमानतळ येथे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी विमान प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांची कानउघाडणी केली. या बैठकीसाठी विमानतळ संचालक सुशीलकुमार श्रीवास्तव, विमानतळ टर्मिनल मॅनेजर एस. मुरली कृष्ण, विमानतळ अभियंता कौस्तुभ ससाणे तसेच विमानतळ प्राधिकरणाचे सर्व अधिकारी तसेच इंडिगो, स्पाइस जेट एअरलाईन्स, स्टेशन मास्तर अशोक मौर्या, राजपथ इंफ्राचे विपुल बावचर उपस्थित होते.

- Advertisement -

विमान प्राधिकरणला सूचना

कोरोनाला हरवून परतलेल्या आ.आशुतोष काळे यांचे काकडी गावात आगमन होताच ग्रामस्थांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत केले. काकडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करत असतांना ग्रामस्थांनी त्यांच्या भोवती गर्दी करून समस्या सांगण्यास सुरुवात केली. त्यावेळी आ. काळे यांनी जमिनीवर बसून काकडी ग्रामस्थ व शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या समस्यादेखील सोडवण्याच्या सूचना त्यांनी विमानतळ प्राधिकरणाला दिल्या.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -