Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम तू माझी झाली नाही तर, कोणाचीच होवू देणार नाही

तू माझी झाली नाही तर, कोणाचीच होवू देणार नाही

प्रेमसंबंधास नकार : भरदिवसा मुलीला पट्ट्याने मारहाण, धमकी देणार्‍यास अटक

Related Story

- Advertisement -

तू माझी झाली नाही तर, तुला कोणाचीच होवू देणार नाही. तुझ्या घरच्यांना मारुन टाकेन अशी धमकी देत एकाने भरदिवसा अल्यवयीन मुलीला प्रेमसंबंधासाठी बळजबरी करत चामडी पट्ट्याने मारहाण केल्याची घटना पंचवटीत घडली. याप्रकरणी पीडित मुलीने पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित राहुल विनोद वाघेला (रा. मेरी कॉलनी, पंचवटी) यास अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी व संशयित राहुल वाघेला हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्याने मुलीशी ओळख वाढवत प्रेमसंबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. प्रेमसंबंधासाठी तो तिच्याकडे बळजबरी करु लागला. तू मला खूप आवडते. माझेसोबत प्रेमसंबंध ठेवावेच लागतील, असे म्हणत त्याने भरदिवसा दुपारी ३.३० वाजता तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीने त्याच्या तावडीतून सुटका करण्यासाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. राग अनावर झाल्याने त्याने तिला चामडी पट्ट्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. जर तू माझी झाली नाही तर, तुला कोणाचीच होवू देणार नाही. तुझ्या घरच्यांना मारुन टाकेन, अशी धमकी देत त्याने तिला शिवीगाळ केली.
त्याच्या तावडीतून सुटका करुन घेतल्यानंतर पीडित मुलीने कुटुंबियांना आपबिती सांगितली. त्यानंतर कुटुंबियांनी तिला धीर देत पंचवटी पोलीस ठाण्यात आणले. तिने संशयित वाघेलाविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक यु. आर. गवळी करत आहेत.

- Advertisement -