घरमहाराष्ट्रनाशिकमहागाईच्या निषेधार्थ ‘वंचित’चा घंटानाद

महागाईच्या निषेधार्थ ‘वंचित’चा घंटानाद

Subscribe

इंधन दरवाढ कमी करण्याची आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांकडे केली मागणी

जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत. तर गॅस, पेट्रोल, डिझेलचे दिवसेंदिवस वाढत असलेले भाव केंद्र सरकारने तात्काळ कमी करावे, या मागणीसाठी सोमवार (दि.२१) रोजी बागलाण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात येऊन बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना निवेदन देण्यात आले.

कोरोनाच्या प्रादूर्भावाने प्रत्येक कुटुंबाच्या जीवितावर, दैनंदिन आर्थिक व्यवहारावर विपरीत परिणाम केले आहेत. लॉकडाऊनमुळे लाखो लोकांचे रोजगार बुडाले अनेकांचे वेतन मिळणे दूरापास्त झाले असताना केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरण असंवेदनशीलतेमुळे घरगुती इंधन, दळवळण इंधन, खाद्य तेल, जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय संसाधने आदी घटकांचे दर नागरिकांच्या आर्थिक आवाक्याबाहेर पोहोचले आहेत.

- Advertisement -

सामान्य नागरिकांची आर्थिक गणिते कोलमडली असताना महागाईने त्रस्त जनतेला धोरणात्मक दिलासा देण्याऐवजी दोन्ही सरकारं बघ्याची भूमिका घेत असल्याने जनतेच्या असंतोषाचा उद्रेक समोर येण्याची चिन्हे आहेत. त्याचाच भाग म्हणून आज वंचित बहुजन आघाडीतर्फे राज्यभर आंदोलन छेडण्यात आले. या विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी तात्काळ पावलं उचलावीत अन्यथा सरकारला धारेवर धरण्यासाठी आणखी तीव्र आंदोलन हाती घेण्यात येईल. केंद्र सरकारची निंदा करताना, घोषणा देत घंटानादाने परिसर दणाणून निघाला होता. राज्य सरकारविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. हाताला काम नाही अशा परिस्थितीत जीवनावश्यक वस्तू भरमसाठ महाग झाल्याने सर्वसामान्य त्रस्त झाली आहे. याची दखल केंद्र व राज्य शासनाने घेऊन वाढलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा. याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी जिल्हा सचिव आनंद दाणी, जिल्हा संघटक सुनील जगताप, जिल्हा प्रवक्ता प्रा. अमोल बच्छाव, माजी तालुकाध्यक्ष चेतन वनिस, तालुका महासचिव दादासाहेब खरे, तालुकाध्यक्ष शेखर बच्छाव, तालुका संघटक कडू वनिस, कैलास आहिरे, सहसचिव दिलीप गांगुर्डे, दीपक बच्छाव, निलेश देवरे, सचिन आहिरे, साहेबराव मोरे, किशोर म्हसदे उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -