घरताज्या घडामोडीलाचखोर कृषी उपसंचालक गजाआड

लाचखोर कृषी उपसंचालक गजाआड

Subscribe

द्राक्ष निर्यातीसाठी फायटो परवाना देण्यासाठी कृषी उपसंचालक कार्यालयात मंगळवारी (दि.३) शेतकर्‍यांकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना कृषी उपसंचालकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केले. नरेंद्र आघाव असे अटक करण्यात आलेल्या कृषी उपसंचालकाचे नाव आहे.

द्राक्ष एक्सपोर्टसाठी फायटो परवाना देण्यासाठी आघाव यांनी शेतकर्‍यांकडे पावणेदोन लाखांची मागणी केली होती. तडजोडीअंती मंगळवारी (दि.३) एक लाख रुपये देण्याचे ठरले होते. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिककडे तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. कार्यालयात पंचांसमक्ष एक लाख रुपये स्वीकारताना नरेंद्र आघाव यांना पथकाने अटक केली. आघाव यांच्याविरुद्ध यापुर्वीही अनेक तक्रारी शेतकर्‍यांनी केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -