घरमहाराष्ट्रनाशिकलाखोंचा खर्च करूनही ग्रीन जीम धुळखात

लाखोंचा खर्च करूनही ग्रीन जीम धुळखात

Subscribe

मनसेच्यावतीनेे विभागीय अधिकारयांना निवेदन

नविन नाशिक विभागातील प्रभाग क्रमांक २९ मधील महाकाली चौकातील ग्रीन जीम साहित्य धुळखात पडले आहेत. हे साहित्य लवकरात लवकर बसवावे अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेच्यावतीने विभागीय अधिकार्‍यांना निवेदनाव्दारे देण्यात आला.

सिडकोत वाढत्या शहरीकरणात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती वाढली आहे. परंतु, वाढत्या नागरी वस्ती बरोबरोच महापालिकेने नागरी सुविधा देखील उपलब्ध करून देण्याचा प्रयत्त केला. मात्र, महापालिका छत्रपती शाहु महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम ग्राउंड, महाकाली चौक येथील ग्रीन जीम लावण्यासाठी गेल्या दिड ते दोन वर्षांपासून आणण्यात आले आहे. परंतू हे साहित्य अद्यापही बसविण्यात आलेले नाही. हे साहित्य धुळखात पडून आहे. तरी, आठ दिवसांत हे साहित्य बसविण्यात यावे अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -