घर महाराष्ट्र नाशिक येवल्यासाठी १ कोटी ४२ लाखांची विकासकामं मंजूर!

येवल्यासाठी १ कोटी ४२ लाखांची विकासकामं मंजूर!

Subscribe

नाशिकच्या येवला आणि निफाड तालुक्यांमध्ये विकासकामांसाठी सुमारे दीड कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे.

जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषदेकडील ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेमधून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून येवला मतदारसंघात १ कोटी ४२ लाख रुपयांच्या मुलभूत सुविधांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये रस्ता काँक्रिटीकरण, पाण्याची टाकी, भूमिगत गटार बांधकाम, स्ट्रीट लाईट या कामांचा समावेश आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती व गावांचा विकास करणे या योजनेतून मुलभूत कामांसाठी जिल्हा परिषदेला निधी दिला जातो.

कुठे होणार विकासकामं?

या विकासकामांमध्ये निफाड तालुक्यातील भरवस येथे भूमिगत गटार ५ लाख, नांदुरमध्यमेश्वर रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी १० लाख, कोटमगाव राजवाडा येथे भूमिगत गटार करण्यासाठी ५ लाख, पिंपळगांव नजीक गोपीनगर येथे रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी ५ लाख, पाचोरे खु. येथील आंबेडकर नगर येथे पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी ५ लाख, विंचूर येथील अण्णाभाऊ साठे नगर येथे भूमिगत गटार करण्यासाठी ५ लाख, विंचूर येथील सिद्धार्थ नगर येथे भूमिगत गटार करण्यासाठी ५ लाख, वेळापूर येथील रायगड नगर येथील रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी ५ लाख, वाकद येथील रमाई नगर रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी १० लाख, विष्णूनगर येथील आंबेडकर नगर येथे पाण्याची टाकी बसवण्यासाठी २ लाख, विंचूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे गटार भूमिगत करण्यासाठी ५ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.


हेही वाचा – ‘नामको’त प्रगती पॅनलची एकहाती सत्ता

लवकरच कामाला सुरुवात होणार!

- Advertisement -

याशिवाय येवला तालुक्यातील आडसुरेगांव आंबेडकर नगर येथे भूमिगत गटार, आहेरवाडी निरभवणे वस्ती येथे पाण्याची टाकी बांधकाम, बाभूळगाव बनसोडे वस्ती येथे रस्ता काँक्रीटीकरण, भाटगाव येथे जगताप वस्ती येथे भूमिगत गटार, भारम आंबेडकर नगर येथे रस्ता काँक्रिटीकरण, बोकटे दलित वस्ती येथे रस्ता काँक्रिटीकरण, धुळगाव शेवगे वस्ती येथे रस्ता काँक्रीटीकरण अशा निफाड आणि येवला तालुक्यातील मुलभूत सुविधांसाठी एकूण १ कोटी ४२ लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. या मुलभूत सुविधांच्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -