घरताज्या घडामोडीविरोधीपक्ष नेते फडणवीसांची शनिवारी साहित्य संमेलनास उपस्थिती

विरोधीपक्ष नेते फडणवीसांची शनिवारी साहित्य संमेलनास उपस्थिती

Subscribe

महापौर सतीश कुलकर्णी संमेलनात घेणार सक्रीय सहभाग

नाशिक – कुसुमाग्रज नगरीत होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पत्रिकेत नावावरून निर्माण झालेल्या वादाला अखेर पूर्णविराम मिळालाय. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शनिवारी (दि. ४) साहित्य संमेलनास उपस्थित राहणार असून, महापौर सतीश कुलकर्णी साहित्य संमेलनात सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळांनी फडणवीस व महापौर कुलकर्णी यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली. या दोघांनीही संमेलनात सहभागी होणार असल्याचा शब्द दिला.

नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनास नाशिक महानगरपालिकेकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जात असून, निधीदेखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. नाशिकचे साहित्य संमेलन आपल्यासर्वांचे असून, सर्वांच्या सहभागाशिवाय हे यशस्वी होणार नाही. त्यामुळे नाशिककर म्हणून संमेलन यशस्वी करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. तसेच, महापौर म्हणून संमेलनासाठी येणाऱ्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करावं लागणार आहे. त्यामुळे आपण या संमेलनात सहभागी व्हावं, असं आवाहन त्यांनी महापौर कुलकर्णी यांना केलं.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -