घरताज्या घडामोडीदेवेंद्र फडणवीस व्यवहारात कमी पडले, अजित पवारांची टीका

देवेंद्र फडणवीस व्यवहारात कमी पडले, अजित पवारांची टीका

Subscribe

परीक्षेत कमी गुण मिळालेले विद्यार्थी वर्गात बसले आणि जास्त गुण मिळालेले विद्यार्थी वर्गाबाहेर असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर अजित पवार यांनी अत्यंत मार्मिक शब्दांत टोला लगावला. कमी गुण मिळवणारा विद्यार्थी व्यवहारात हुशार, तर जास्त गुण मिळवणारा व्यवहारात कमी पडतो, असे प्रत्युत्तर देत त्यांनी फडणवीसांची खिल्ली उडवली.

नाशिक विभागाच्या आढावा बैठकीनिमित्त शुक्रवारी (दि.31) अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजप-शिवसेना युती सरकारच्या कार्यकाळात फडणवीसांनी आपल्या नागपूर जिल्ह्याला 237 कोटी रुपये अतिरिक्त देऊन राज्यातील इतर जिल्ह्यांवर अन्याय केला. फडणवीसांनी सत्तेचा गैरवापर केला आहे. परंतु, आता निधी वापराच्या सूत्रानुसार प्रत्येक जिल्ह्याला निधी देण्यात येईल. त्यामुळे कोणावर अन्याय होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. प्रत्येक जिल्ह्याची लोकसंख्या, ग्रामीण भाग, क्षेत्रफळ आणि मानव विकास निर्देशांक या चार गोष्टींच्या आधारे जिल्ह्याला नियतव्यय देण्याचे सूत्र ठरले आहे. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी देण्याचे नियोजन सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे उपस्थित होते.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -