घरताज्या घडामोडीनाशिक जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्ह रेट जास्त, ऑक्सिजनचे २ टँकर मिळवून देण्याबाबत फडणवीसांचे...

नाशिक जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्ह रेट जास्त, ऑक्सिजनचे २ टँकर मिळवून देण्याबाबत फडणवीसांचे आश्वासन

Subscribe

नाशिकला २ अधिक ऑक्सिजन टँकर मिळाल्यास गावापातळीवर ऑक्सिजन बेड तयार करण्यात येतील

नाशिकमध्ये कोरोना परिस्थिती चिंताजनक झाली आहे. सर्वाधिक रुग्ण हे नाशिक जिल्ह्यात आढळत आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दौऱ्यादरम्यान कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे. नाशिकमध्ये कोरोना परिस्थिती अधिक बिकट आहे. नाशिक जिल्ह्याचा कोरोना पॉढिटिव्हिटी रेट सर्वाधिक आहे. नाशिक विभाग आणि नगर या दोन्ही जिल्ह्यांतील कोरोना पॉझिटिव्हिटी ३० टक्क्यांवर आहे. त्यामुळे नाशिकमध्ये अधिक ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला पाहिजे. असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीसांनी नाशिक विभागीय आयुक्त आणि सिव्हिल रुग्णालयातील सिव्हिल सर्जन यांची भेट घेऊन जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

नाशिकमध्ये कोरोना परिस्थिती चिंताजनक आहे. विशेषता नाशिक जिल्ह्याच्या कोरोना पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे. नाशिक विभागाचा आणि नगरचा पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्क्यांवर आहे. इतर जिल्ह्यांचा १० टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे नाशिकमधील परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. तसेच दौऱ्यादरम्यान सिव्हिल रुग्णालयाला भेट दिली. त्याठिकाणी सिव्हिल सर्जन यांची भेट घेऊन जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. सिव्हिल सर्जन यांनी दिलेल्या माहितीमुळे नाशिकला दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

नाशिकमध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या ही कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांपेक्षा अधिक आहे. परंतु लक्षणे असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन बेड, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याला अधिक रेमडेसिवीर इंजेक्शन मिळाले पाहिजे यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

नाशिकमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या बिटको कोरोना रुग्णालयात एकूण ७७१ कोरोना रुग्ण उपचार घेत आहे. या रुग्णालयातच खुप मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत. मोठे रुग्णालय तयार केल्यामुळे नाशिककरांना चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. परंतु काही रुग्णांनी आणि नागरिकांना सफाई बाबत तक्रारी केल्या आहेत. याबाबत डॉक्टरांशी बोललो असता सफाई कामगारांना कोरोनाची लागण झाल्यामुळे कर्मचारी कमी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नव्या कर्मचाऱ्यांची भर्ती करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

- Advertisement -

नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळे २ ऑक्सिजन टँकर मिळण्याची आवश्यकता आहे. याबाबत विभागीय आयुक्तांची कंपन्यांशी बोलणे करुन दिले आहे. जामनेर आणि जिंदाल यांना २ टँकर देण्याबाबत विनंती केली आहे नाशिकला २ अधिक ऑक्सिजन टँकर मिळाल्यास गावापातळीवर ऑक्सिजन बेड तयार करण्यात येतील तसेच गावातील लोकांवर तेथेच उपचार करण्यात येतील असे केल्याने नाशिकमध्ये ताण येणार नाही. तसेच खासगी रुग्णालयांनाही ऑक्सिजन पुरवठा करु शकू असे फडणवीसांनी सांगितले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -