Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक गणेश विसर्जनासाठी ऑनलाईन स्लॉटद्वारे करा बुकिंग

गणेश विसर्जनासाठी ऑनलाईन स्लॉटद्वारे करा बुकिंग

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी पालिकेचा निर्णय, घराजवळील केंद्रांचीही मिळणार माहिती

Related Story

- Advertisement -

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी नाशिक महापालिकेनं ऑनलाईन गणेश विसर्जन टाइमस्लॉट बुकिंग सुविधा सुरू केलीय. या सुविधेमुळे गणेशभक्तांना घराजवळच्या केंद्रांची माहिती मिळतानाच, आपल्या वेळेनुसार विसर्जनाचे नियोजन करता येणार आहे.

या सुविधेच्या माध्यमातनं नागरिकांना दीड, पाच, सात आणि दहा दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी वेळ निश्चित करता येईल. या सुविधेमुळे नागरिकांना त्यांच्या बाप्पाचं विसर्जन त्यांच्या वेळेप्रमाणे करता येईल. तसंच, घराजवळ विसर्जन केंद्र नेमकं कुठेय, त्याचीही माहिती मिळू शकेल. बुकिंग केलेल्यांना पालिकेतर्फे विसर्जनस्थळी प्राधान्य दिलं जाईल. महापालिकेच्या वेबसाईटद्वारे ही बुकिंग सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलीये.

- Advertisement -

टाइम स्लॉट बुकिंगसाठी पुढील लिंकवर करा क्लिक :
http://slotbooking.nmc.gov.in/

- Advertisement -