घरक्राइम'डायल ११२' गाडी समोर उभी, पोलीस वामकुक्षीत मग्न; टोळक्याकडून तरुणाला मारहाण

‘डायल ११२’ गाडी समोर उभी, पोलीस वामकुक्षीत मग्न; टोळक्याकडून तरुणाला मारहाण

Subscribe

नाशिक : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या टोळक्याने शुक्रवारी (दि.३) दुपारी एका मित्राला मारहाण केल्याची घटना नवीन नाशिक परिसरातील छत्रपती संभाजी स्टेडियम परिसरात घडली. विशेष म्हणजे, पोलिसांची ११२ ची गाडी मैदानात उभी असतानाही पोलिसांकडून टोळक्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. परिणामी, नवीन नाशिकमध्ये पोलिसांबाबत उलटसुलट चर्चा सुरु होती.

संभाजी स्टेडियम येथे शुक्रवारी दुपारी २.४५ वाजेदरम्यान काही महाविद्यालयीन तरुणांनी एका मित्राला बोलावून घेतले. तो आल्यावर त्यांच्यात वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दरम्यान, तात्काळ मदत मिळण्यासाठी असलेली पोलिसांची ११२ क्रमांकाची गाडी संभाजी स्टेडियम मध्येच झाडाखाली उभी होती आणि गाडीतील पोलीस वामकुक्षी घेत होते. गाडीपासून हाकेच्या अंतरावर हाणामारी होऊनही पोलिसांना त्याची खबरबात नव्हती. त्यामुळे कारवाई करणारेच ऑन ड्युटी झोपेत असतील तर सर्वसामान्य नागरिकांना आता स्वतःच्या जीविताच्या रक्षणासाठी पोलिसांवर विसंबून रहाणे चुकीचे ठरेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही वेळानंतर संबंधित तरुण पसार झाले. शेवटी भीतीपोटी मारहाण झालेल्या तरुणानेही घटनास्थळावरुन निघून जाणे पसंत केले.

- Advertisement -

डायल ११२ ची गाडी संभाजी स्टेडियम मध्ये असतांना पोलिसांच्या उपस्थितीत एका बाजूला तरुणांच्या हाणामार्‍या होत होत्या तर दुसर्‍या बाजूला स्टेडियमच्या पायर्‍यांवर प्रेमीयुगुलांचे प्रेमचाळे आणि मद्यपिंचे झिंगणे सुरू असतांनाही झाडाखाली सावलीत गाडी लावून पोलीस वामकुक्षी घेत असतील तर नागरिकांच्या सुरक्षेला वाली कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -