Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम ब्राह्मणपाड्यावर आग लागली की लावली?

ब्राह्मणपाड्यावर आग लागली की लावली?

कृषीमंत्र्यांचे चौकशीचे आदेश; आगीत होरपळून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

पालघर जिल्ह्यातील ब्राह्मण पाडा (ता. मोखाडा) येथील अनंता मौळे यांच्या घर व दुकानाला लागलेली आग शॉर्टसर्किटमुळे लागली की हा घातपात होता, याची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. सोमवारी (दि.२९) त्यांनी नाशिकमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात या कुटुंबातील जखमींची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

ब्राह्मणपाडा येथील अनंता बाळू मौळे यांच्या दुकान व घराला रविवारी (दि.२८) मध्यरात्री शॉटसर्किटमुळे आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने माल जळून खाक झाला असून, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. वृद्ध आई गंगुबाई मौळे, पत्नी द्वारका मौळे, मुलगी पल्लवी मौळे (वय १२), मुलगा कृष्णा मौळे (वय १०) यांचा मृत्यू झाला आहे. जखमी भावेश मौळे (वय १३) व मुलगी अश्विनी मौळे (वय १६) यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेत अनंता मौळे यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर मोखाडा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही आग समाजकंटकांनी लावली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी दादा भुसे यांनी जिल्हा रुग्णालयात येत जखमींशी संवाद साधला. त्यांच्यावर वैद्यकीय अधिकार्‍यांनी योग्य ते उपचार करावेत, अशी सूचना भुसे यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांना दिली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, डॉ. श्रीनिवास, डॉ. पंकज गाजरे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisement -