घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रबिलावरुन वाद; बेकरीचालकावर कोयत्याने हल्ला, आरोपींची धिंड

बिलावरुन वाद; बेकरीचालकावर कोयत्याने हल्ला, आरोपींची धिंड

Subscribe

नाशिक : सातपूर परिसरात गोळीबाराची घटना ताजी असतानाच कार्बननाका परिसरातील अभिषक बेकरीमध्ये केक देण्याचा बिलावरून वाद झाल्याने टोळक्याने शनिवारी ( दि.२५) रात्री ९ वाजेच्या सुमारास बेकरीचालकावर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेत त्यांची धिंड काढली.

शुभम अरुण पवार (वय २१, रा. ध्रुवनगर, सातपूर), हेमंत अरुण गाडेकर (२१, रा. शिवाजी नगर, सातपूर), मुकेश दिलीप कुंभार (२१, रा. श्रमिकनगर, सातपूर), सागर सुरेश गायकवाड (१९, रा. शिवाजीनगर, सातपूर), नयन विठ्ठल गावडे, पंकज ऊर्फ विकी कैलास (२८, रा. सातपूर) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपूरमधील शिवाजी नगर भागात शनिवार( दि.२५)रात्री ९ वाजेच्या सुमारास अभिषक बेकरीमध्ये सात ते आठ युवकांनी बेकरीचालकांशी वाद घातला. त्यानंतर टोळक्यांना युवकांना बोलावून बेकरीचालक व कामगारांना धमकावून कोयत्याचा वार करण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. याप्रकरणी बेकरीमालक अनिकेत सुरेश जाधव यांनी सातपूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आहेर करीत आहेत.या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -
रस्त्यावर साजरे केले जाताहेत वाढदिवस

 सातपूरमध्ये रात्रीच्या वेळी खुलेआम मोकळ्या मैदानात दारू पार्टीतून वादावादी होण्याची घटना घडत आहेत. भररस्त्यात केक कापून धिंगाणा करत आरडा ओरडा करण्याची घटना दररोज घडत आहेत. यावर अंकुश पोलीस प्रशासन लावणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -